तासगाव तालुका क्रीडा संकुलासाठी राज्य क्रीडा व युवक कल्याण विभागाकडून ३ कोटी निधी उपलब्ध – आम. सुमनताई पाटील यांची माहिती

0
92

क्रीडासंकुलासाठी ६१ कोटी १६ लाख रु. च्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता

तासगाव प्रतिनिधी ता १३:
 तासगाव येथील तासगाव तालुका  क्रीडा संकुलासाठी राज्य  क्रीडा व युवक कल्याण  विभागाने ३ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती आमदार सुमनताई पाटील यांनी दिली.  क्रीडा संकुलासाठी ६१ कोटींचा प्रस्ताव दिला असुन त्याला प्रशासकिय  मान्यता मिळाली असलयाचेही त्यांनी सांगितले. 
     राज्य  क्रीडा व युवक कल्याण विभागाने राज्यातील ३५ तालुक्यात तालुका क्रीडा संकुल योजनेतून निधी दिला आहे त्यामध्ये तासगाव तालुका  क्रीडा संकुल साठी सर्वाधिक ३ कोटींचा निधी देण्यात आला आहे. हा निधी देण्याचे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना देण्याचे आदेश देण्यात आले  आहेत.  निधीची उपलब्धता होताच कामाचे भूमिपूजन करण्यात येईल असे आमदार श्रीमती पाटील यांनी सांगितले.
       तासगाव शहरात सद्या असलेल्या क्रीडा संकुल मध्ये ८ एकर जागेमध्ये  सद्या या ठिकाणी ४०० मिटर्सचा ट्रॅक तयार असून 
यावर्षी या क्रीडा संकुलासाठी  आणखी ३ कोटी निधी उपलब्ध झाला आहे.  लवकरच या कामाला सुरुवात करत असल्याची माहिती त्यांनी दिली. 
     राज्य शासनाने ६१ कोटी १६ लाख ११ हजार रुपये खर्चाच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये तासगाव तालुका क्रीडा संकुलात ४०० मीटर्स धावनपथ ( सिंथेटिक ट्रॅक) व फुटबॉल ग्रास मैदानासह, २ व्हॅलीबॉल कोर्ट आसन व्यवस्थेसह, ३ मजली वस्तीगृह, इनडोअर जिम्नॅशिअम हॉल, प्रसाधनगृह, चेंजिग रुम, व्हीआयपी लांउज, प्रेक्षा गॅलरी,कमर्शियल गाळे, यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here