धाराशिव – राष्ट्रवादीचे युवा नेते आ. रोहित पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. १३ ऑगस्ट रोजी या दौऱ्याची सुरुवात महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या तुळजापूर येथून होणार आहे.त्यानंतर ते धाराशिव येथील पक्ष कार्यालयात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मतदारसंघ निहाय आढावा घेणार आहेत.
राष्ट्रवादीतील एक मोठा गट सत्तेत सामील झाल्यानंतर अधिवेशनाच्या काळात आ. रोहित पवार यांनी सभागृहात वेगवेगळे विषय मांडत आक्रमक भूमिका घेतली होती. मराठवाडा दौरा हा मी घेऊन येतोय साहेबांचा संदेश ही टॅग लाईन वापरून सुरू होत असल्याने या दौऱ्यात ते नेमके काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे.