सलगरा येथे मानाच्या गणपतीचे साध्या पद्धतीने विसर्जन

0
75



सलगरा, दि.१९ (प्रतिक भोसले)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथे घरगुती गणपती पाठोपाठ मानाच्या गणपतीचे सुद्धा विसर्जन कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करता साध्या पद्धतीने करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत थाटात होणाऱ्या मिरवणुकीला व जल्लोषाला फाटा देऊन शांततेने व भक्तीमय वातावरणात ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात विघ्नहर्त्या गणरायाला निरोप देण्यात आला.

तरी सुध्दा काही अनुचित प्रकार घडू नये या साठी नळदुर्ग पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सुधीर मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करत गणेश मंडळाचे अध्यक्ष जयराम लोमटे, उपाध्यक्ष प्रशांत मुळे, सरपंच विष्णू वाघमारे, उपसरपंच प्रशांत लोमटे, उत्तमराव लोमटे, भजनी मंडळ अध्यक्ष कुमार लोमटे, राजेंद्र कोळी, काशिनाथ रवळे, आदींनी गणपतीचे विसर्जन केले. तसेच सुनियोजित पध्दतीने विसर्जन संपन्न व्हावे या साठी बिट अंमलदार काळे व  वि.बी.खांडेकर यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here