उस्मानाबाद – जिल्हयात काही भागात अतिवृष्टी होत असुन पिक विमा भरलेल्या पिकाचे नुकसान विमा संरक्षित क्षेत्र जलमय होऊन, ढगफुटी होऊन, पुराचे पाणी शेतात शिरुन, शेत दिर्घकाळ जलमय होऊन नुकसान झाले असल्याने शेतकरी नुकसानीच्या सुचना देत आहेत. तसेच यापुढे देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. तेंव्हा शेतकऱ्यांनी यापुढेही पिक विमा भरलेल्या पिकांचे नुकसान झाल्यास घटना घडल्यापासुन ७२ तासाच्या आत याबाबतची सुचना विमा कंपनी व कृषि विभागास देणे बंधनकारक आहे. यामध्ये नुकसान कळविताना सर्वे नंबरनिहाय नुकसानग्रस्त क्षेत्राचा तपशील कळविणे आवश्यक आहे.
प्राप्त झालेल्या सुचनेनंतर संयुक्त समितीमार्फत शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी करण्यात येईल. पिक विमा भरलेल्या ज्या पिकांचे नुकसान झाले आहे अशा पिकांच्या नुकसानीच्या सुचना शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरुन Crop Insurance किंवा विमा कंपनीचे Farmimitra हे अॅप डाऊनलोड करून त्या अॅपव्दारे आपल्या नुकसानीची माहिती द्यावी किंवा १८००२०९५९५९ या टोल फ्री क्रमांकावर कळवावी तसेच संबंधित गावचे कृषि सहाय्यक व तालुका कृषि अधिकारी कार्यालयात ऑफलाईन पध्दतीने देखिल अर्ज करुन कळवु शकतात असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या वतीने करण्यात येत आहे.