कुंडल: प्रतिनिधी
सगळीकडे पाण्याचे राजकारण सुरू असताना पलूस तालुक्यातील कुंडल हे गाव मात्र पिण्याच्या पाण्याकडून स्वयंपूर्ण झाले आहे यासाठी जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांनी केलेल्या भगीरथ प्रयत्नांना अखेर यश आले.
कुंडल ला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून जलजीवन मिशन कार्यक्रमातून 5 कोटी 25 लाख रुपये पिण्याच्या पाण्याच्या योजनेला मंजुरी मिळाली होती.यातून नदीवर अत्याधुनिक असे जॅकवेल,इंटेकवेल, पंपसेट बसवण्यात येणार आहेत. यातून गावात अंतर्गत 26 किलोमीटर पाईप लाईन मंजूर होती आता ती वाढून 41 किलोमीटर होणार आहे.या योजनेत वाडी वस्त्यांवरील भागाला पाणी पुरवठा करणेसाठी वाढीव तरतुदी साठी प्रयत्न सुरू होते याची नामदार जयंत पाटील आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दखल घेऊन 1 कोटी 70 लाखांचा वाढीव निधी मंजूर केला,याअंतर्गत गावात जो पाणी पुरवठा होणार आहे तो पूर्ण क्षमतेने होईल यासाठी, या योजनेचे प्रत्यक्ष काम लवकरच पूर्ण होईल अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांनी दिली.
ते म्हणाले परिसरातील गावांच्या तुलनेत कुंडल हे गाव पाण्याच्या बाबतीत इथूनपुढे स्वयंपूर्ण होईल, जरी 24 तास पाणी आले तरी नागरिकांनी पाणी जपूनच वापरले पाहिजे, लवकरच या योजनेचे काम पूर्ण करून क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापूंच्या स्वप्नातील योजनेला पूर्णत्वास नेऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.