विटा (शिराज शिकलगार) विटा कराड रोड वरील शिवार धाब्याच्या पाठीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये बिहार येथील कुटुंब वास्तव्याला होते सदर नरेश रघुवीर सहा हा युवक अनेक दिवसापासून आजारी व मानसिक संतुलन त्याची वारंवार बिघडत होती. किरकोळ कारणावरून नवरा बायकोचे सारखेच भांडण होत असल्याचे आजूबाजूला नागरिकातून घटनास्थळी चर्चा होती .. कधी चांगला तर कधी मनोरुग्ण प्रमाणे हा नरेश वागत होता असेही त्या ठिकाणी नागरिकातून बोलले जात होतं. गेली दोन दिवस झालं. नरेश असा एकदम शांत होता परंतु चिडचिड करणे हा त्याचा स्वभाव होता या रागाच्या भरातच पती-पत्नीचे किरकोळ कारणावरून भांडण झालं यावेळी नरेश रघुवीर सहा याची पत्नी लीलावती देवी नरेश सहा वय 32 या दोघांमध्ये गुरुवारी सकाळी पुन्हा वाद झाला या वादाचे रूपांतर किरकोळ हाणामारी वर गेले पती पत्नीचे भांडण लागल्याचे आजूबाजूला काही आपापल्या घरा समोर उभा राहून आजूबाजूचे नागरिक पाहत होते. परंतु हे किरकोळ पती पत्नीचे भांडण वरच्या टोकाला गेल्याने आणि राग मनामध्ये धरलेला नरेश रघुवीर सहा वय 36 हे कुटुंब बिहारचे आहे विटा शहरांमध्ये कामानिमित्त काही महिन्यापूर्वी आल्याचे समजते नरेश यांचा तापट स्वभाव असल्याने तो वारंवार संतुलन बिघडल्या सारखेच वागत होता याच रागाच्या भरात सकाळी साडेसातच्या दरम्यान पुन्हा नवरा-बायकोमध्ये जोराचे भांडण झाले या भांडणांमध्ये रागाच्या भरात असणारा नरेश याने हातामध्ये चाकू घेऊन आपली पत्नी लीलावती देवी सहा यांच्या पोटामध्ये खूपसल्याने ती जागीच मृत्यू झाली.
ही माहिती ्या परिसरात वार्यासारखी पसरली घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. हा घात घडताच सुभाष सहा यांनी तातडीने विटा पोलीस ठाण्यात धाव घेतली सदर या सर्व प्रकारची माहिती विटा पोलिसांना रीतसर तक्रार द्वारे दिली पोलीस विटा उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके, विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे यांनी ज्या ठिकाणी या महिलेचा खून झाला त्याठिकाणी घटनास्थळी पाहणी केली यावेळी विटा उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मा कदम यांनी घटनास्थळी तातडीने पाहणी करून सदर आजूबाजूला थोडी माहिती घेतली. किरकोळ वादातूनच आपल्या पत्नीवर चाकू हल्ला केल्याने सदर जबर जखमी झालेली पत्नी तिला हॉस्पिटल मध्ये आणि घेऊन येताना वाटेतच तिचा मृत्यू झाल्याची ही समजले.
तसेच लीलावती यांचा पती नरेश रघुवीर सहा हा वारंवार आजारी असल्याने बिहार येथे पत्नी लीलावती यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. या अनुषंगाने आपल्या पतीस बिहार येथे परत नेण्यासाठी पत्नी बिहार येथून आपल्या तीन मुलींसह एक मुलगा घेऊन विटा येथे आले असताच बुधवारी रात्री या दोघांमध्ये घरातच किरकोळ वाद चालला होता असे तेथील नागरिकातून बोलले जात होते. किरकोळ वाद सकाळी झाल्याने या रागाच्या भरातच आरोपी नरेश रघुवीर सहा याने घराकडे जाणारा रस्त्यावरच पत्नीवर हल्ला केला. हल्ला होताच काही तेथील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.. तातडीने विटा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पत्नी वरती चाकूने हल्ला करणाऱ्या पतीला तातडीने ताब्यात घेऊन अटक केली.. विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी त्या खून झालेल्या परिसरामध्ये आजूबाजूला तातडीने काही माहिती घेतली. किरकोळ कारणावरून या पती-पत्नीमध्ये वाद झाला होता या वादा मध्येच सदर मानसिकता संतुलन बिघडलेल्या पतीनेच आपल्या पत्नी लीलावती देवीचा खून केल्याचे समजले . सदर लीलावती देवी सह या खून झालेल्या महिलेला विटा शहरातील सांगली रोड येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये रुग्णवाहिकेचे मधून हलवण्यात आले.. तोवर या महिलेचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले… विटा उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे साहेब यांनी घटनास्थळी जाऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवून तात्काळ आरोपी नरेश रघुवीर सह वय 36 याला ताब्यात घेतले पुढील तपास विटा पोलीस करीत आहेत.