आरोपी विरुद्ध पोस्को सह विनयभंगाचा गुन्हा दाखल, आरोपीस अटक
परंडा प्रतिनिधी ( दि ३० सप्टेंबर)परंडा येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस घरात बोलावून वेळोवेळी लैंगिक छळ केल्या प्रकरणी आरोपी सचिन हाके परंडा यांच्या विरुद्ध विविध कलमा नुसार दि ३० रोजी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे .
पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की आरोपी सचीन हाके याने अल्पवयीन मुलीस घरात बोलावून माहे फ्रेबुवारी ते दि २९ सप्टेबर रोजी पर्यंत घरात बोलाऊन धमकी देत छळ केला .
या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादी वरून आरोपी सचिन हाके विरूद्ध परंडा पोलिसात ॲट्रोसिटी,पोस्को, विनयभंग कलम नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे .
या घटनेचा तपा उपविभागीय पोलीस अधिकारी एम रमेश यांच्या कडे देण्यात आला आहे.