वारणानगर-(प्रतिनिधी) श्री वारणा भगिनी मंडळ वारणानगर या संस्थेची ४८ वी वार्षिक साधारण सभा दि.२९.०९.२०२१ वार बुधवार रोजी संपन्न झाली या सभेच्या प्रमुख पाहुण्या सौ.वासंती प्रतापचंद्र रासम (श्री वारणा विभाग शिक्षण समूह,प्रशासकीय अधिकारी) या होत्या त्यांनी महिलांच्या सुप्त गुणांना वाव देणे व्यवसाय वृद्धी साठी त्यांना प्रोत्साहित करणे महिलांच्या हस्तकलेला व्यवसायाचे स्वरूप देवून त्यांच्या अर्थजनाचा मार्ग मोकळा करणे या विषयी मार्गदर्शन केले तसेच स्वर्गीय माननीय आईसाहेब यांनी महिलांसाठी संस्था निर्माण केल्या व त्या संस्थामधून स्त्रियांचे सक्षमीकरण व सबल बनविण्याचे काम कसे केले याविषयी ही त्या बोलल्या .
सभेच्या अध्यक्षा सौ.स्नेहाताई निपुणराव कोरे यांनी संस्थेच्या मागील वर्षाचा पूर्ण आढावा घेतला व संस्थेच्या सर्व कर्मचारी महिलांचे आभार मानले तसेच आईसाहेबांनी सुरु केलेल्या या संस्थांची धुरा समर्थपणे पेलत पुढे सर्वांच्या मदतीने या संस्था प्रगती पथाकडे नेण्यासाठी मार्गदर्शन केले.
मागील वर्षात कोरोना असूनही संस्थेने १ कोटी ३ लाख ८४ हजार इतकी विक्री केली आहे तसेच कोरोना ग्रस्त लोकांना ,व कोरोना सेंटर मधील लोकांना जेवण पुरविण्याचे काम संस्थेने केले या विषयी त्या बोलल्या .
तसेच यावेळी सर्व विषय बहुमताने मंजूर करणेत आले या सभेचे सूत्रसंचालन सौ विद्या विजय टकले यांनी केले तसेच श्रद्धांजली ठराव हि त्यांनी मांडला स्वागतगीत श्री वारणा भजनी मंडळ मधील महिलांनी केले . प्रमुख पाहुण्यांची ओळख सौ विद्या विजय टकले यांनी करून दिली व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सौ स्नेहाताई निपुणराव कोरे यांनी केला तसेच कोडोली ग्रामपंचायत सदस्या सौ स्वाती प्रकाश हराळे यांचा सत्कार सौ रासम मॅडम यांनी केला .सभा नोटीस वाचन हेमनंदा जालंदर पाटील यांनी केले व प्रोसिडिंग वाचन सौ वर्षा विश्वास आपटे यांनी केले या कार्यक्रमामध्ये सालाबाद प्रमाणे आदर्श कामगार पुरस्काराची घोषणा करणेत आली यामधे सौ विजया शिवाजी रणदिवे व श्रीमती सुशीला शंकर गोडबोले यांना आदर्श कामगार पुरस्काराने सन्मानित करणेत आले .
या सभेस सावित्री महिला ओद्योगिक संस्थेच्या चेअरमन व श्री शोभाताई कोरे वारणा महिला पतसंस्थेच्या संचालिका व वारणा भगिनी मंडळाच्या संचालिका सौ शुभलक्ष्मी विनयरावजी कोरे या उपस्थित होत्या सभेत भगिनी मंडळातील सर्व संचालक मंडळ पदाधिकारी सौ कल्पना सुरेश पडवळ , श्री जालंदर शंकर पोवार व सभासद उपस्थित होते संस्थेच्या संचालिका सौ शोभा अनिल साखरपे यांनी आभार मानले आणि सभा संपन्न झाली .