back to top
Wednesday, January 15, 2025
Google search engine
Homeताज्या बातम्यारेल्वे प्रश्न शक्य तितक्या वेगाने मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील खासदार राजेनिंबाळकर

रेल्वे प्रश्न शक्य तितक्या वेगाने मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील खासदार राजेनिंबाळकर

 

 उस्मानाबाद (प्रतिनिधी) २०१४ मध्ये लोकसभेच्या प्रचारा निमित्त तुळजापूरात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या तुळजापूर रेल्वेमार्गासाठी आपण क्य तितक्या वेगाने काम करून हा प्रश्‍न सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन मार्गी लावणार असल्याचे तुळजापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

      तुळजाभवानी मंदिरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीत सुधारणा व्हावी याकरिता जिल्ह्यातील शिवसेनेच्या वतीने महाआरती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला तुळजापूर रेल्वेने जोडावे यासाठी आपण दर महिन्याला महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन आढावा घेत आहोत या रेल्वे मार्गातील भूसंपादनाची प्रक्रिया आता सुरू झाली आहे ६० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच महत्त्वाची प्रक्रिया होते आणि त्यासाठी आपण स्वतः इतर लोकप्रतिनिधींच्या मदतीने हे काम शक्य तेवढ्या वेगाने करण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे सांगितले.

     तुळजाभवानी मंदिरातील दर्शनानंतर मंदिर संस्थान समितीच्या कार्यालयात व्यवस्थापक योगिता कोल्हे महसूलचे उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांच्याशी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर,आमदार कैलास पाटील, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

    मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने भाविकांची गरज आणि सोय याकडे साफ दुर्लक्ष असल्या संदर्भात खासदारांनी समितीच्या कामकाजासंदर्भात नाराजी व्यक्त केली तसेच यापुढील काळात मंदिर समितीने स्वतःचे कायदे भाविका वर न लागता भाविकांची गरज काय आहे हे ओळखून मुख्य दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था तात्काळ अंमलबजावणी करावी असे आदेश बैठकीत दिले. आणि त्यानंतर लागलीच या आदेशाची अंमलबजावणी देखील मंदिरात सुरू झालेली आहे.भाविकांना आता मुखदर्शन सोय उपलब्ध झालेली आहे.

     सर्व लोकप्रतिनिधी समवेत महसूल अधिकाऱ्यांनी एक समान वागणूक द्यावी,स्वतःच्या मर्जीने सपत्नीक वागणूक देऊ नये.असे देखील खासदार राजेनिंबाळकर, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी तुळजाभवानी मंदिर समितीच्या अध्यक्षा योगिता कोल्हे आणि उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांना बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेत सुनावले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments