पागा गल्ली, शिंदे गल्ली येथील नागरिकांच्या सह महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
तासगाव प्रतिनिधी/
मुथूट फायनान्स कंपनी च्या वतीने दिवंगत एम जी जॉर्ज मुथ्युट यांच्या स्मरणार्थ तासगाव तालुका राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित दादा पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून तासगाव कवठेमहांकाळ च्या लोकप्रिय आमदार सुमनताई पाटील यांच्या हस्ते तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघासाठी एक सुसज्ज ॲम्बुलन्स व्हॅन त्यामध्ये सर्व प्रकारच्या तपासण्या करण्याची सुविधा असलेली अंबुलन्स लोका अर्पण सोहळा नुकताच पार पडला होता
तासगाव शहरांमध्ये सध्या विविध प्रभागांमध्ये सदरच्या सुसज्ज अंबुलन्स च्या माध्यमातून नागरिक बंधू भगिनींचे रक्त तपासणी मोहीम त्यामध्ये पाच प्रकारच्या तपासण्या होऊन शहरामध्ये काय दोष असतील ते दाखवण्याची उत्तम कामगिरी या मुलींच्या माध्यमातून सध्या सुरू आहे. से शुक्रवार दिनांक 12 व शनिवार दिनांक 13 रोजी प्रभाग क्रमांक चार सांगली नाका येथे पहिल्या दिवशी ९०, तर दुसर्या दिवशी ८५ नागरिक बंधू भगिनी यांनी आपली रक्त तपासणी करून घेऊन सदरच्या मोहिमेस उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला होता.
सदरच्या तपासण्या जुलाब मध्ये करण्यासाठी नागरिक गेले तर या सर्व तपासणी करण्यासाठी एक हजार रुपये पेक्षा जास्त खर्च येत असतो परंतु आमदार सुमनताई पाटील युवा नेते रोहित दादा पाटील सुरेश भाऊ पाटील यांच्या माध्यमातून सदर सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या होत्या सदर चे तपासणी कॅम्प सामाजिक कार्यकर्ते स्वामी रामानंद भारती सहकारी सूतगिरणीचे माजी संचालक तथा दैनिक जनमत चे तासगाव तालुका प्रतिनिधी राहुल भैय्या कांबळे यांच्या पुढाकाराने सदरचे तपासणी मोहीम यशस्वी झाली आहे. या मोहिमेस सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ बोबडे, नरेंद्र आबा मोरे, संजय घोरपडे, ज्ञानू पवार, सचिन शिंदे, मिलिंद कांबळे, रोहित गोळे, अनिल काळे,अजय पवार, तुषार कांबळे, विनीत कांबळे, आदित्य कांबळे, परशुराम वाघमारे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कांबळे इत्यादींनी विशेष सहकार्य केले होते. तर रक्ततपासणी मोहीम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हजारे सर व त्यांच्या सर्व शिक्षक,शिक्षीका स्टाफ तसेच पार्वती कार्यालयाचे मालक प्रताप शेठ पवार यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक बटु पवार सर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष एडवोकेट गजानन गुजर साहेब तासगाव नगरपालिका राष्ट्रवादीचे गटनेते नगरसेवक बाळासाहेब सावंत, माजी नगराध्यक्ष अजय काका पाटील, अमोल नाना शिंदे, बंडू काका शेटे एडवोकेट तुकाराम कुंभार, कमलेश तांबेकर स्वप्नील जाधव, अगं गल्लीतील राष्ट्रवादीचे नेते युनूस भाई, ज्येष्ठ मार्गदर्शक रशीद भाई, अमित पवार राष्ट्रवादीचे युवक शहर अध्यक्ष अभिजित पाटील,उदय पाटील,व पागा गल्ली सांगली नाका यशवंत हायस्कूल परिसर शिंदे गल्ली येथील नागरिकांनी विशेष सहकार्य केले होते. तर प्रभाग क्रमांक चार मध्ये शिंदे गल्ली परिसरा मध्ये दि.११ रोजी यादव व घाडगे सरकार यांच्या विशेष प्रयत्नातून ७६ नागरिकांचे रक्त तपासणी पार पडली होती. मुथूट फायनान्स चे तासगाव ब्रांच शाखाधिकारी अभिनंदन मडके साहेब, मुथूट फायनान्स अंबुलन्स चे स्टाफ जीवन प्रवीण कांबळे, अक्षय केशव चव्हाण, राकेश नानासाहेब कांबळे,गजानन दत्तात्रेय होनमोरे, इत्यादी चे विशेष सहकार्य मिळाले होते. सर्वात विशेष बाब म्हणजे दोनशेपर्यंत या नागरिक बांधवांनी व बहिणीने रक्त तपासणी केली असता ९६ ते ९७ टक्के नागरिकांची रिपोर्ट अतिशय उत्तम असल्याचे निदर्शनास आले आहे ही समाधानाची बाब आहे. कारण सध्या गेले दीड ते दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण होते. त्या पार्श्वभूमीवर ही तपासणी मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यात आली असल्याने नागरिकांच्या मध्ये समाधानाचे व उत्साहाचे वातावरण आहे प्रभाग चार मधील सांगली नाका पागा गल्ली, यशवंत हायस्कूल परिसर, मुरसल गल्ली येथील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार राहुल कांबळे यांचे विशेष आभार व्यक्त केले आहे.