back to top
Saturday, December 21, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याएस. बी. आय डेप्युटी मॅनेजरची मुजोरी शेतकऱ्याच्या तोंडावर फेकली कर्जाची फाईल!

एस. बी. आय डेप्युटी मॅनेजरची मुजोरी शेतकऱ्याच्या तोंडावर फेकली कर्जाची फाईल!

 

खासदारांनी बँकेत जाऊन घेतला समाचार!


उस्मानाबाद – उस्मानाबाद शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया ची मुजोरी कशी चालते याचा अनुभव अनेक शहरवासीयांना यापूर्वी आला आहे. मात्र आज वेगळाच प्रकार समोर आल्याने खुद्द खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना बँकेत यावे लागले.

धारूर येथील शेतकरी विश्वनाथ पवार आणि तुकाराम मोरे यांची पीक कर्जाची फाईल डेप्युटी मॅनेजर कांबळे यांनी तोंडावर फेकून मारली कारण दोन्ही शेतकऱ्यांनी बळजबरी माथी मारत असलेल्या १०२५० रू हेल्थ इन्शुरन्स घेण्यास नकार दिला होता. हा घडलेला प्रकार त्यांनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना देखील फोनवर सांगितला डेप्युटी मॅनेजर यांना फोनवर बोलण्याची विनंती केली मात्र त्यांनी नकार दिल्याने खुद्द ओमराजे निंबाळकर बँकेत आले. यापूर्वी पीक कर्ज घेणाऱ्या किती शेतकऱ्यांना बळजबरी ने हे हेल्थ इन्शुरन्स घेण्यास भाग पाडले याची चौकशी करण्याची आणि त्याचा अहवाल देण्याची मागणी त्यांनी डी डी आर यांच्याकडे केली. तसेच शेतकऱ्यांच्या बाबतीत जो फाईल तोंडावर फेकण्याचा प्रकार घडला त्याचे सीसीटिव्ही फुटेज घेऊन वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच येत्या अधिवेशनात शेतकऱ्यांना बँकांकडून जी वागणूक मिळते जो त्रास सहन करावा लागतो त्याबद्दल तारांकित प्रश्न विचारणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आज घडलेल्या प्रकाराबद्दल एस बी आय मुख्य शाखा यांना विचारले असता त्यांनी अधिक माहिती देण्यास बाईट देण्यास नकार दिला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments