सलगरा (प्रतिक भोसले ) – लग्न समारंभासाठी जात असताना अपघात होऊन पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून ११ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
सचिन भावसार (४०) आणि राणी भावसार (३४) मुलगा कौस्तुभ(११) रा. देऊळगाव राजा ह.मु. औरंगाबाद तिघे औरंगाबादहून गुंजोटी ता. उमरगा येथे लग्नसमारंभासाठी पहाटे एम एच २० सी एस ०६७० या चार चाकी वाहनातून निघाले होते सकाळी ८.३० गंधोरा पाटीजवळ झाडावर गाडी धडकली यात पती पत्नी दोघांचा मृत्यू झाला असून मुलगा कौस्तुभ याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात भरधाव वेगाने गाडी चालवताना वाहनावरील ताबा सुटल्याने झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मयत पती पत्नी चे शव नातेवाईकांच्या ताब्यात दिले असून गंभीर दुखापत झालेल्या मुलाला तुळजापूर येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. घटनास्थळी महामार्ग पोलिस मदत केंद्र नळदुर्ग चे सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड आणि त्यांचे पथक दाखल झाले असून. पुढील तपास करत आहेत.