उस्मानाबाद –
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या कामगारांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत साखळी उपोषण केलं आहे. महाराष्ट्रात वीज कंपन्याच्या मंडळ कार्यालयासमोर दि.२२ नोव्हेंबर पासून हे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. तिन्ही कंपन्यात बदली धोरण एकसारखे करावे,निश्चित केलेल्या बदली धोरणाचे अमंलबजावणी करावी,रजा रोखीकरणाचे पैसे तात्काळ द्यावे,पागरवाढ फरकाचा तिसरा हप्ता तात्काळ द्यावा.० ते ४० युनिट चेक रेडींग आणण्याची जबाबदारी संबंधित रेडींग एजन्सी वर टाकावी,५००० वरील विज बिल थकबाकीची वसुली चर्चे ठरल्याप्रमाणे जबाबदारी निश्चित करणारे परिपत्रक काढावे,मुख्य कार्यालय येथे फिल्ड वरील तांत्रिक व लेखा प्रवर्गातील पदोन्नतीतील सर्व त्यांनी तात्काळ करावे या मागण्या करता हे उपोषण करण्यात येत आहे. यावेळी संयुक्त सचिव बी एस काळे, कॉम्रेड परवेज पठाण ,झोन सचिव कॉम्रेड एबी माळी ,श्रीकांत गिरी,केंद्रीय कार्यकारिणी सदस्य एस आर गंगावणे मंडळ सचिव कॉम्रेड जकाते कॉम्रेड एस जे बळवंत नितीन मोटे इत्यादी कामगार या साखळी उपोषणात सहभागी झाले आहेत.