उस्मानाबाद – उस्मानाबाद बसस्थानकात आज बस सेवा सुरू झाली मात्र ही बस सेवा सुरू होताच एक पुरुष कर्मचारी आणि एक महिला कर्मचारी चक्कर येऊन पडल्याने गोंधळ उडाला.
आज सकाळी पहिली बस उस्मानाबाद ते तुळजापूर रवाना झाली त्यानंतर उस्मानाबाद ते उमरगा ही बस फलाटावर येऊन थांबली. या बस चे कंडक्टर मनोज खवळे चक्कर येऊन पडल्याने गोंधळ निर्माण झाला यामध्ये एस टी चे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये बाचबाची झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आणखी एका महिला कर्मचाऱ्याला देखील चक्कर आल्याने दोघानाही दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
उस्मानाबाद विभागातील सत्तावीसशे कर्मचाऱ्यांपैकी 350 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. यात यांत्रिकी , प्रशासकीय विभागात काम करणारे कर्मचारी यांचा समावेश असून कामावर हजर झालेल्या ड्रायव्हर , कंडक्टर च्या मदतीने तुळजापूर आणि उमरगा आगारातील प्रत्येकी दोन बसेस सोडण्यात आल्या आहेत. चक्कर येऊन पडलेले कंडक्टर मनोज खवळे यांना शुद्ध आली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलीस बंदोबस्तात बस सेवा
उस्मानाबाद बस स्थानकात दोन कर्मचाऱ्यांना चक्कर आल्याने गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात बस सेवा सुरू असून नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कोणी निर्माण केल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया आनंद नगरचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी दिली