उस्मानाबाद – 6 ब्रास वाळू भरलेला ट्रक क्र. एम.एच. 13 आर 3459 हा दि. 07- 08.12.2021 रोजी दरम्यानच्या रात्री जळकोटवाडी (नळ), ता. तुळजापूर येथे रस्त्याकडेला उभा असतांना अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला होता. अशा मजकुराच्या पोलीस पाटील- देवीदास हरीदास चव्हाण यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत 405 / 2021 हा गुन्हा नोंदवला आहे.
सदर गुन्हा तपासादरम्यान स्था.गु.शा. च्या पोनि- श्री. गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- श्री. मनोज निलंगेकर, पोहेकॉ- काझी, शेळके, कवडे, पोकॉ- ढगारे, ठाकूर, उंबरे यांच्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अफकपूर, जि. कलबुर्गी, राज्य- कर्नाटक येथील वकील शंकर चव्हाण यास ताब्यात घेउन त्याच्या ताब्यातून नमूद ट्रक जप्त केला आहे.