सलगरा,दि.१२(प्रतिक भोसले)
तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) गावचे विद्यमान उपसरपंच प्रशांत लोमटे यांची भाजपा च्या तुळजापूर तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. तर अनिल मुळे यांची तालुक्याच्या चिटणीस पदी निवड करण्यात आली आहे, दोघांना निवडीचे पत्र तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री कै. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त १२ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या शेतकरी संवाद मेळाव्यात देण्यात आले. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तालुका पातळीवर काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा आभारी असुन येणाऱ्या काळात पक्षबांधणी, पक्षाचे विचार, आचार, ध्येय – धोरणे तसेच केंद्र शासनाने जनसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या योजना या आ. सुजितसिंह ठाकूर आणि आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील राहीन असे म्हणत तालुका उपाध्यक्ष उपसरपंच प्रशांत लोमटे आणि तालुक्याचे चिटणीस अनिल मुळे या दोघांनी आभार व्यक्त केले.
या वेळी पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान अवताडे, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नगरसेवक अभिजित कदम, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे भाजपा शिक्षक आघाडीचे सदस्य प्रभाकर मुळे यांच्या सह अनिल मुळे, गोविंद व्हंदारणे, ज्ञानेश्वर बोधणे, तात्या केदार, दस्तगीर मुलाणी, अनिल लोमटे, भागवत लोमटे, मनोज लोमटे, दिलीप मुळे, पापा मुलाणी, सुनिल अंदगावकर, अभिजित लोमटे, तानाजी पुजारी आदी उपस्थित होते.