वाहतूक नियम मोडणाऱ्या ३६११ जणांवर कारवाई १५ दिवसांत २२ लाखाचा दंड वसूल

0
93

 


उस्मानाबाद -( कुंदन शिंदे) वाहतुकीचे नियम मोडल्यास दंडाची रक्कम वाढली आहे याची जाणीव असताना देखील वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा खिसा रिकामा होतो आहे.  उस्मानाबाद जिल्ह्यात १२ डिसेंबर ते २७ डिसेंबर दरम्यान केलेल्या ३६११ कारवाया मध्ये २२,६३,४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे यामध्ये उस्मानाबाद शहर वाहतुकीने १३२८ केसेस मध्ये एकूण ७,९६,३०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

 उस्मानाबाद शहरात ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना या नव्या नियमानुसार दंड आकारला आहे. वाहतूक  नियमांचे पालन जे वाहनधारक करत नाहीत अशा वाहनधारकांवर धडक मोहिम वाहतूक पोलिसांच्या वतीने राबविण्यात येत आहे उस्मानाबाद शहरातील १३२८ केसेस पैकी लायसन्स नसणे १५ केसेस दंड ७५०००, लायसन्स सोबत न बाळगणे ५३४ केसेस दंड २७५०००, ट्रिपल सीट केसेस ९५ केसेस दंड ९५००, मोबाईल वापर केसेस २० दंड २१०००, पोलिसांचा हुकूम न मानने केसेस ८८ दंड ४७०००, विना हेल्मेट केसेस ३३ दंड १६५००, विना सिटबेल्ट केसेस ३६ दंड ९९००, रहदारीस अडथळा केसेस ९२ दंड ४७०००, विना नंबर केसेस २०९ दंड १०५५००, विना साईड ग्लास केसेस ११७ दंड ५८५००, इतर कलमान्वये केसेस ८९ दंड ४५९०० इतका दंड आकारण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here