उस्मानाबाद शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई नगरपालिकेकडून केली जात आहे शहरात ओमीक्राॅन या नवीन व्हॅरीयंट चा प्रादुर्भाव असल्यामुळे प्रतिबंधात्मक खरबरदारी म्हणून शहरातील नागरिक विना मास्कचे फिरत असल्यामुळे ही कारवाई केली जात आहे. या कारवाईसाठी नगरपालिकेची ३ पथके नेमली आहेत या पथकामध्ये २१ कर्मचारी व अधिकाऱ्यांचा समावेश असून या संदर्भातील आदेश मुख्याधिकारी तथा प्रशासक हरिकल्याण येलगट्टे यांनी दिले आहेत या २१ कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. पाहिले पथक छत्रपती शिवाजी महाराज चौक, पोलिस स्टेशन, छत्रपती शिवाजी शाळा, सांजा रोड,उंबरे कोठा,बार्शी नाका इतर भागाची व्याप्ती दिली आहे या पथकाचे प्रमुख एस.पी.कांबळे हे आहेत.तर दुसरे पथक नेहरू चौक,बाजार चौक,दर्गा रोड,खाजा नगर,आडत लाईन, देशपांडे स्टॅण्ड,भिम नगर,सईस गल्ली,खाटीक गल्ली या भागात कारवाई करेल. या पथकाचे प्रमुख व्ही एस.गोरे आहेत तर तिसरे पथक समता कॅलनी,राम नगर ,समर्थ नगर, डी आर सी रोड,गालीब नगर, महात्मा नगर, आनंद नगर,एम आय डी सी दोन्ही भाग शाहू नगर या भागात कारवाई करेल. याचे पथक प्रमुख गोरख रणखांब हे आहेत. गेल्या दोन लाटेचा अनुभव पाहता जिल्हा रुग्णालय आणि मोठे दवाखाने शहरात असल्याने रुग्ण वाढीचा धोका अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.