सलगरा,दि.१६(प्रतिनिधी)
लोहारा तालुक्यातील न्यु व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तू बनविण्यास सांगितले होते. म्हणुन त्याच अनुषंगाने तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथील प्रणय प्रताप मोरे या सहावीतील विद्यार्थ्याने मुलांमध्ये किल्ल्यांबरोबरच
इतिहासा विषयी आवड व ओढ निर्माण व्हावी, तसेच मोबाईल – टीव्ही, गेममध्ये रमलेल्या मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव देता यावा, त्यांच्यात ओढ निर्माण व्हावी या दृष्टीने शिवनेरी किल्ला तयार केला असून हा किल्ला किराणा दुकानातील तसेच घरातील विविध टाकाऊ वस्तूंचा वापर करून केला आहे. असे प्रणय चे वडील प्रा. प्रताप मोरे यांनी सांगितले, तसेच त्याने केलेल्या किल्ल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने घरी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या महिलांनी सुद्धा त्याचे कौतुक केले आहे.