उस्मानाबाद – येथील जिल्हाधिकारी कार्यलया बाहेर, विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक राज्य सरकारने मागे घ्यावे या मागणीकरिता भारतीय जनता युवा मोर्चा उस्मानाबाद युवती विभागातर्फे काळी रांगोळी काढून निषेधात्मक आंदोलन करण्यात आले.
महाविकास आघाडीने जे विद्यापीठ कायदा काळे विधेयक जे साभागृहात पारित केले त्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा सातत्याने वेग-वेगळ्या पद्धतीने त्याचा विरोध दर्शवत आहे. या आधी युवा मोर्चाने लाखोंच्या घरात मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड पाठवले, हे काळे विधेयक मागे घ्या या विषयावर मोठ्या प्रमाणात मिस्ड कॅाल्स , मेल करून मुख्यमंत्र्यांना आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना सडेतोड उत्तर दिलेत आणि संपुर्ण महाराष्ट्रातुन फोन करून आग्रहाची मागणी केली की विद्यापीठ विधेयक त्वरित मागे घ्यावे.
विद्यापीठात राजकारण आणु नये, ज्या प्रकारचे तुमचे मनसुबे आहेत की शिक्षणात राजकारण करून स्वताःचे हित साधण्याचे व विद्यापीठ हे राजकीय अड्डा करण्याचा जो मनसुबा आहे तो भारतीय जनता युवा मोर्चा कदापी होऊ देणार नाही.असा इशारा भाजयुमो च्या वतीने देण्यात आला. आज केवळ जिल्हाधिकारी कार्यालया समोर काळी रांगोळी काढुन आज आम्ही आमचा विरोध दर्शविला आहे. विधेयक वापस घेण्याकरीता महाविकास आघाडीने त्वरित कारवाही केली नाही तर भविष्यात अधिक उग्र रूप घेईल व जनमाणसाच्या दबावाला तुम्हाला झुकावे लागेल आणि हे काळे विधेयक तुम्हाला मागे घ्यावे लागेल असा खणखणीत इशारा यावेळी देण्यात आला ,प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील महामंत्री राहुल लोणीकर यांच्या सुचने नुसार व आमदार राणाजगजितसिंह पाटील ,आ,प्रदेश भाजप सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर ,जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शन व भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजे निंबाळकर ,यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले याप्रसंगी समन्वयक व उपनगराध्यक्ष अभय इंगळे ,प्रदेश कार्यकारणी सदस्य युवती विभाग पूजा देडे ,युवती जिल्हा संयोजिका पूजा राठोड ,सरचिटणीस देवकन्या गाडे ,प्रियांका घोलप ,प्रगती जहागीरदार,सरचिटणीस कुलदीप भोसले ,जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील नाईकवाडी ,चिटणीस प्रीतम मुंडे ,गणेश एडके ,तालुका अध्यक्ष ओम नाईकवाडी ,कोषाध्यक्ष रोहित देशमुख ,हिम्मत भोसले ,प्रमोद बचाटे ,पपिन भोसले ,श्रीराम मुंबरे ,प्रसाद मुंडे ,प्रसाद राजमाने व इतर युवामोर्चा ,युवती आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तिथ होते .