काक्रंबावाडी येथे हरभरा कीड – आळी नियंत्रण कार्यशाळा संपन्न

0
69

सलगरा,दि.३०(प्रतिनिधी)

 तुळजापूर तालुक्यातील काक्रंबावाडी येथे हरभरा कीड, आळी नियंत्रण कार्यशाळा घेण्यात आली होती. यावेळी पवन कणसे आणि दुलानगे शेतीशाळा प्रमुख यांनी हरभरा व कीड आळी नियंत्रित कशाप्रकारे करता येईल यावर मार्गदर्शन केले, हरभऱ्यावर कोणकोणते रोग पडतात त्यावर कोणती औषध फवारणी करायला हवी. फवारणी करताना घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन केले.

    या वेळी गावातील शेतकरी, ग्रामस्थ तसेच पोलीस जाणीव सेवा संघ चे काक्रंबावाडी येथील प्रमुख महेश बजरंग कोळेकर व सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here