उस्मानाबाद
विज वितरण कंपनीने विज पुरवठा खंडित करण्याची कारवाई बंद करावी या मागणीसाठी शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी अधिक्षक अभियंता उस्मानाबाद यांना निवेदन दिले या निवेदनात विजपुरवठा खंडित करण्याची मोहिम त्वरीत बंद करावी,विजे बिले दुरूस्त करून द्यावीत,इगतपुरीच्या शेतकऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेऊन त्यांना मुक्त करावे, बेकायदेशीर वीज पुरवठा खंडित करणाऱ्या वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागण्या करण्यात आल्या. त्यानंतर अधिक्षक अभियंता मंडळ कार्यालयासमोर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले या निवेदनावर मराठवाडा अध्यक्ष रामजीवन बोंदर, जिल्हाध्यक्ष नवनाथ जाधवर, विनोद बिक्कड,दिपक वाकूरे,उदय कुलकर्णी,भारत पाटील, जयंत रणदिवे,लक्ष्मण जाधव,सचिन देशमुख, गोरोबा पांचाळ,वामन टेकाळे, बाळासाहेब सरवदे,शामराव पाटील, सुदर्शन सुरवसे, लक्ष्मण मुंडे,हणूमंत बोंदर, नवनाथ देवगिरे, संतोष राठोड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.