उस्मानाबादमध्ये राजकीय होळी, भाजपने केले सरकारविरोधात आंदोलन

0
68

 

उस्मानाबाद  आघाडी सरकारची होळी करुन भारतीय जनता पार्टीच्या वतीने गुरूवार, दि. 17 मार्च 2022 रोजी अनोखे आंदोलन करण्यात आले. सर्वसामान्य जनतेचे, विद्यार्थ्यांचे, शेतकर्‍यांचे जगणे मुश्किल करणार्‍या आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निषेध नोंदवण्यात आला. कमिशन एजंट महाविकास आघाडीच्या नावानं बोऽ बोऽऽ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी बोलताना भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे म्हणाले की, दसर्‍याच्या दिवशी रावणाचे दहन करतो, त्याचप्रमाणे आपण दुष्ट शक्तीचा नाश करण्यासाठी आज महाराष्ट्रावर महाविकास आघाडी सरकारचे संकट दूर व्हावे म्हणून आम्ही या सरकारचा निषेध करतो. हे सरकार भ्रष्टाचार्‍यांना आणि देशद्रोह्यांना पाठीशी घालत आहे. परकीय शक्तीला येथे सहारा देण्याचे काम शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार करत आहे. सर्वसामाान्यांवर अन्याय करणार्‍या, शेतकर्‍यांची वीज तोडणार्‍या  महावसुली सरकारच्या नावाने बोंबाबोंब आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले.


प्रतिष्ठान भवन भाजपा कार्यालय येथे झालेल्या या आंदोलनात भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, तालुकाध्यक्ष ओम नाईकवाडी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजीत देवकते, अभय इंगळे, प्रविण सिरसाठे, दाजीअप्पा पवार, नरेंद्र वाघमारे ,शेशेराव उंबरे ,संदीप इंगळे, प्रीतम मुंडे,राज निकम, श्रीराम मुंबरे, मेसा जानराव, उदय देशमुख, मोहन मुंडे, प्रसाद मुंडे, वैभव हांचाटे, अमोल पेठे, सुनिल पंगुडवाले, मनोजसिंह ठाकुर, अर्जुन पवार, नरसिंग लोमटे, जगदिश जोशी, विशाल पाटील, ज्ञानेश्वर सुळ, अमित कदम, सागर दंडनाईक, स्वप्निल नाईकवाडी, सुजित साळुंके, अजय यादव, सार्थक पाटील, अजय उंबरे,मनोजसिंह ठाकूर, सायासराव मुंडे,ऋषीकेश शिंदे, तात्याराव शिंदे, आदींसह भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here