नुकसानग्रस्त भागाची आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी

0
95




सलगरा,दि.१२(प्रतिनिधी) – 


तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथे दि.१० एप्रिल रोजी सांयकाळी झालेल्या अवकाळी पावसासह मेघगर्जनेबरोबर झालेल्या जोरदार वाऱ्याने गावातील नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले होते. गावातील अनेकांच्या घरांची पडझड झाली होती तर काही जणांच्या घरावरील पत्रे हे उडून गेले होते, तर शेतातील पिकांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. म्हणून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी गंधोरा येथे आज दि.१२ एप्रिल रोजी भेट देऊन नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली अशा परिस्थितीत हवालदिल झालेल्या ग्रामस्थांना धीर देण्यासाठी आ. पाटील यांनी शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधत समस्या जाणुन घेत त्यांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठीचा धीर दिला. नुकसानग्रस्त भगांची पाहणी करून पंचनामे कारावेत असे आ. पाटील यांनी प्रशासकीय यंत्रणेला निर्देशित केले. गावात झालेल्या घरांच्या पडझडीची पाहणी करून पंचनामा करून शासन नियमानुसार आर्थिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे सुध्दा सांगितले. तसेच गंधोरा येथील हनुमान मंदिरासमोर जोरदार वाऱ्यामुळे सप्ताहाचा मंडप कोसळला होता. या मध्ये लाऊड स्पीकर, मशनरी यांचे नुकसान झाले होते. हि झालेली नुकसान लक्षात घेऊन तुम्ही मला पत्र पाठवा मी तुम्हाला आर्थिक हातभार लावतो असे म्हणाले. या वेळी तहसीलदार, महसूल, कृषी, महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांसह ग्रामसेवक, सरपंच तलाठी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here