कुस्तीच्या आखाड्यातला मल्ल आता राजकारणाच्या मैदानात शड्डू ठोकणार!

0
308

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून विकी चव्हाण यांच्या नावाची चर्चा जोरात

धाराशिव –
जिल्हा परिषद निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत जाहीर होताच राजकीय पातळीवर नवे समीकरण घडू लागले आहे. तेरखेडा गट हा यंदा सर्वसाधारण गटासाठी राखीव सुटल्याने, या गटातून तरुण व दमदार व्यक्तिमत्व असलेल्या विकी चव्हाण यांच्या नावाची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे.

गेल्या काही वर्षांपासून समाजकारण, कुस्ती आणि व्यावसायिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या विकी चव्हाण यांनी आता राजकारणाच्या रिंगणात उतरण्याची मनोमन तयारी सुरू केली असल्याचे समजते.

विकी चव्हाण हे सामान्य कुटुंबातून पुढे आलेले, पण मेहनत, मैत्री आणि मनमोकळ्या स्वभावामुळे ओळख निर्माण केलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी कुस्तीच्या आखाड्यात अनेक मल्लांना धूळ चारली असून, आता राजकीय आखाड्यात शड्डू ठोकण्याची वेळ आली आहे, असे त्यांच्या जवळच्या वर्तुळात म्हटले जात आहे.

राजकीयदृष्ट्या ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री तानाजी सावंत, धनंजय सावंत, आणि प्रतापसिंह पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. तानाजी सावंत यांच्या विजयात विकी चव्हाण आणि त्यांच्या टीमचा मोठा वाटा राहिला असल्याची चर्चाही गाजत आहे.

व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी पाऊल टाकणाऱ्या विकी चव्हाण यांचे कार्यकर्ते, मित्रमंडळी आणि चाहत्यांचा मोठा वर्ग असून, तेरखेडा गटातून उमेदवारीची संधी मिळाल्यास या “मल्ला”चं सोनं होईल, असा आत्मविश्वास त्यांच्या समर्थकांमध्ये दिसून येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here