महंतांना उमेदवारी नाकारून ड्रग्स प्रकरणातील आरोपीला उमेदवारी, तुळजापूर नगराध्यक्षपद निवडणुकीत रंगत वाढली
धाराशिव – तुळजापूर नगराध्यक्षपदाची निवडणूक रंगतदार बनली मात्र त्यात रंग चढवले ते सत्ताधाऱ्यांनीच. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी एक पत्र खा. सुप्रिया सुळे यांना लिहिले त्यात त्यांनी विनोद गंगणे या व्यक्तीने ड्रग्स चे हे सगळे प्रकरण उघडकीस आणण्यासाठी पोलिसांना सहकार्य केले. दुर्दैवाने पोलिसांनी सहकार्य करणाऱ्यांनाच यात आरोपी बनविले असा दावा आ. पाटील यांनी केला.खरे तर पोलिसांनी विनोद गंगणेना आरोपी बनवले असे म्हणणे म्हणजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्यावर अविश्वास दाखवण्यासारखे नाही का? विनोद गंगणे यांनी ड्रग्स सेवन केले हे कबूल केले आहे कायद्यानुसार ड्रग्स सेवन करणे हा देखील गुन्हा आहे. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी रॅलीतील भाषणात उल्लेख करताना म्हटले की निवडणुकांच्या वेळी त्यांना महिलांनी ड्रग्स बाबत माहिती दिली मात्र प्रत्यक्षात गुन्हा फेब्रुवारी महिन्यात दाखल झाला मधल्या काळात गुन्हा का दाखल झाला नाही हा देखील अभ्यासाचा विषय आहे.
महंतांना उमेदवारी नाकारून ड्रग्स प्रकरणातील आरोपीला उमेदवारी दिली, महंतांच्या उमेदवारीसाठी नागपुरातून प्रयत्न झाला होता याबाबत आ. राणाजगजितसिंह पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले की हा जावई शोध कुणी लावला त्याला समोर आणा. महंत इच्छागिरी महाराज यांच्या उमेदवारीसाठी नागपूरच नव्हे तर दिल्ली येथून देखील प्रयत्न करण्यात आले होते त्याबाबत तुळजापूर शहरात जोरात चर्चा सुरू आहे त्याला आ. पाटील जावई शोध म्हणत असतील तर हे अजबच म्हणावे लागेल.
महंत इच्छागिरी महाराज सध्या संत मार्गदर्शक समिती, विश्व हिंदू परिषद, विभाग- धाराशिव.
सदस्य श्री. पंच दशनाम जुना आखाडा, वाराणसी, उत्तर प्रदेश,मठाधिपती – सोमवारगिरी मठ, तुळजापूर,
अध्यक्ष – नारायणगिरी मठ ट्रस्ट, तुळजापूर,सचिव – श्री दुधेश्वर नाथ महादेव मंदिर, गाझियाबाद, उत्तर प्रदेश
संरक्षक नमम फाउंडेशन, उत्तर प्रदेश,
अध्यक्ष, मठ मंदिर समन्वय समिती, विभाग – तुळजापूर
संरक्षक – अंतर राष्ट्रीय हिंदू शक्ती सेना, भारत वर्ष अशा विविध जबाबदा-या पार पाडत आहे. वरील जबाबदाऱ्या पाहता त्यांच्यासाठी वरिष्ठांनी प्रयत्न केले नसतील असा अन्वयार्थ काढणे चुकीचे ठरेल मात्र भाजपाच्या विचारसरणीसाठी झटणाऱ्या महंतांना उमेदवारी न देणे ही देखील शोकांतिका ठरेल.
- राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांमधून माल लुटणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक
- जिल्हा परिषदेच्या पुरस्कार वितरणात राजकारण;निकष पूर्ण न करणाऱ्यांचा गौरव
- पारगावात अवैध वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश हॉटेल पृथ्वीराज लॉजवर छापा; दोन पीडित मुलींची सुटका
- राजकीय राजधानीत गावगाडा विरुद्ध राजवाडा रंगत रंगणार, इंजिनियर विरुद्ध इंजिनियर उभारणार
- राज्यातील १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान; ७ फेब्रुवारीला मतमोजणी
