नगरपरिषद व नगरपंचायती निवडणुकांच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने तुळजापूर व धाराशिव परिसरात अवैध हातभट्टी निर्मितीविरोधात मोठी संयुक्त मोहीम राबवली. आयुक्त राजेश देशमुख, संचालक (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, तसेच विभागीय उपआयुक्त (छ. संभाजीनगर) संगिता दरेकर यांच्या आदेशानुसार आणि धाराशिव अधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम हाती घेण्यात आली.
या कारवाईत निरीक्षक डी. एल. दिंडकर (तुळजापूर), दुय्यम निरीक्षक एस. पी. कांबळे, पुष्पावती वायकुळे, भरारी पथक धाराशिवचे दुय्यम निरीक्षक बी. टी. ढोकरे, तसेच तलमोड येथील सीमा तपासणी नाका प्रभारी एम. बी. जाधव यांच्या पथकांनी पळसगाव तांडा परिसरात अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्रांवर साखळी छापे टाकले.
या कारवाईत महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत एकूण १० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. तपास पथकांनी १२,१०० लिटर गुळमिश्रीत रसायन, ७३० लिटर तयार गावठी दारू, तीन मोटारसायकली व इतर साहित्य असा एकूण ६,९३,३०५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
मोहीमेत दुय्यम निरीक्षक आर. के. बागवान, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आर. आर. गिरी, तसेच जवान व्ही. ए. हजारे, व्ही. दहिफळे, एस. एच. नन्नवरे, ए. ए. गवंडी, टी. एच. नेर्लेकर, ए. खराडे, ए. गटकांबळे, ए. इंगळे, एस. पी. मुंजाळ, एन. डी. गरड, एस. सी. कोल्हे यांच्यासह इतर कर्मचारी तसेच वाहनचालक ए. आर. शेख व एस. बी. कलमले यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
या संयुक्त मोहिमेचा पुढील तपास निरीक्षक डी. एल. दिंडकर, एम. बी. जाधव आणि कु. पुष्पावती वायकुळे करत आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या धडक कारवाईमुळे पळसगाव तांडा परिसरातील अवैध दारूगुन्हेगारीला मोठा आळा बसल्याचे मानले जात आहे.
- राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांमधून माल लुटणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक
- जिल्हा परिषदेच्या पुरस्कार वितरणात राजकारण;निकष पूर्ण न करणाऱ्यांचा गौरव
- पारगावात अवैध वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश हॉटेल पृथ्वीराज लॉजवर छापा; दोन पीडित मुलींची सुटका
- राजकीय राजधानीत गावगाडा विरुद्ध राजवाडा रंगत रंगणार, इंजिनियर विरुद्ध इंजिनियर उभारणार
- राज्यातील १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान; ७ फेब्रुवारीला मतमोजणी
