
परंडा (दि. ८ ऑगस्ट) : परंडा तालुक्यातील सोनगिरी येथील शेतशिवारात महावितरणचा डीपी (ट्रान्सफॉर्मर) पोलवरून खाली उतरवून त्यातील सुमारे ३८ हजार रुपयांचे तांबे (कॉपर तार) आणि ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत अधिनियम (सुधारणा) २००३च्या कलम १३६ अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परंडा येथील महावितरण कार्यालयात सहायक अभियंता म्हणून कार्यरत असलेले संकेत सुरेंद्र मगर (वय २५, रा. परंडा) यांना दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण नामदेव वेताळ (रा. सोनगिरी) यांनी फोनवरून कळविले की, शकुंतला सुरेश वेताळ यांच्या गट क्र. ३० मधील शेतात बसविलेला डीपी बंद पडला आहे.
या माहितीनंतर सहायक अभियंता संकेत मगर यांनी जनमित्र वायरमन संदीप धन्यकुमार देशमुख यांच्यासह तात्काळ सोनगिरी शिवार गाठून पाहणी केली. त्यावेळी डीपी जमिनीवर उतरवलेला असून, त्याचे झाकण उघडे असल्याचे दिसून आले. डीपीमधील आतील साहित्य आणि ऑईल चोरीस गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सहायक अभियंता मगर यांनी परंडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
चोरी गेलेला मुद्देमाल :
- ६० किलो वजनाची कॉपर कॉईल (तार) : अंदाजे किंमत १८ हजार रुपये (३०० रुपये प्रति किलो)
- २०० लिटर ट्रान्सफॉर्मर ऑईल : अंदाजे किंमत २० हजार रुपये (१०० रुपये प्रति लिटर)
एकूण मालमत्ता नुकसान : ३८ हजार रुपये
दि. ६ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेपासून ७ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या दरम्यान ही चोरी झाली असल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अज्ञात चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.
- संजय निंबाळकर व भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांचा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश; आ.कैलास पाटील यांच्या नेतृत्वात पक्षाची पुन्हा मजबूत बांधणी
- पारगावच्या लॉजवर AHTUचा धडाका!वेश्याव्यवसायावर पोलिसांची थेट कारवाई; परराज्यातील ८ महिलांची सुटका, लॉज मालक-मॅनेजर यांना अटक
- तुळजापुरात सरकारने हिंदुत्व गुंडाळलं, चायनिज कंपनीचे सीसीटीव्ही असलेल्या प्रकल्पाचे उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
- पवनचक्कीचे साहित्य चोरणारी सराईत टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
- परंड्यात अवैध शस्त्र बाळगणारे दोन अल्पवयीन पोलिसांच्या जाळ्यात; मॅगजिनसह अग्निशस्त्र जप्त