धाराशिव जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर

0
355

धाराशिव प्रतिनिधी :
धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी गटांचे आरक्षण अखेर आज (सोमवार) जाहीर करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून जिल्ह्यात या आरक्षणाबाबत चर्चा रंगली होती. आज आरक्षण निश्चित झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीच्या तयारीसाठी कंबर कसली आहे.

आरक्षण जाहीर होताच तालुक्यांतील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून विविध पक्षांनी संघटनात्मक हालचालींना गती दिली आहे. महिला उमेदवारांनाही यंदा मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध झाली आहे.


🔹 अनुसूचित जातीसाठी राखीव गट – ९ (महिला – ५)

सिंदफळ (महिला), वडगाव सि. (महिला), डिकसळ (महिला), सांजा, येरमाळा (येरमाळा), काक्रबा, खामसवाडी, सास्तुर (महिला), शहापूर.


🔹 अनुसूचित जमातीसाठी राखीव गट – १

ढोकी.


🔹 इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी राखीव गट – १४ (महिला – ७)

वालवड (महिला), शिराढोण, उपळा (महिला), पळसप, येडशी, काटी (महिला), काटगाव, लोणी (महिला), येणेगुर (महिला), मोहा (महिला), मंगरूळ, पाथरूड, तुरोरी (महिला), सुकटा (महिला).


🔹 सर्वसाधारण गटासाठी राखीव – ३१ (महिला – १६)

ईट (महिला), आष्टा, पारगाव (महिला), पारा (महिला), तेरखेडा, ईटकुर, मंगरुळ (महिला), नायगांव, कोंड (महिला), तेर (तेर), अंबेजवळगा (महिला), पाडोळी, केशेगाव (महिला), बेंबळी, शेळगाव, आनाळा (महिला), जवळा (नि.), डोंजा, जळकोट (महिला), अणदूर, नंदगाव, कानेगाव (महिला), माकणी (महिला), जेवळी (महिला), कवठा, बलसूर (महिला), कुन्हाळी (महिला), गुंजोटी, दाळिंब, आलूर, कदेर (महिला).


आरक्षणाच्या घोषणेनंतर काही गटांमध्ये समाधान तर काही ठिकाणी नाराजीचे सूरही उमटले आहेत. काही नेत्यांनी अपेक्षित गट त्यांच्या प्रवर्गासाठी न राखीव झाल्याने नाराजी व्यक्त केली असून, यापुढील काही दिवसांत राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, या आरक्षणामुळे महिलांसाठीचा राजकीय सहभाग मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अनेक नवीन चेहरे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरतील, अशी शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here