भाजपने हिंदुत्व सोडलं?, ‘माधव’ला धक्का?, जरांगे फॅक्टर चालला तर आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा करिष्मा घटला!

0
7

धाराशिव जिल्हा परिषदेतील निकालाचे विश्लेषण

धाराशिव – धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने भरघोस यश मिळवले असून गत निवडणुकीत 4 सदस्य असणाऱ्या भाजपने 19 वर मजल मारली असली तरी हा विजय मिळविण्यासाठी भाजपाने आपल्या भूमिकांमध्ये बदल केले असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. राजकीय पक्षाने सर्वधर्म समभाव पाळावा अशी आपली राज्यघटना सांगते आणि कोणताही पक्ष ती भूमिका घेत असेल तर त्याचे स्वागत करायला हवे त्याचे समर्थन करायला हवे मात्र भाजपने यापूर्वी उमेदवारी देताना मुस्लिम उमेदवार दिले नसल्याचे चित्र होते मात्र या निवडणुकीत त्यांनी दोन उमेदवार दिले त्यातील एक उमेदवार निवडून आला तर दुसऱ्याचा पराभव झाला विशेष म्हणजे त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मंत्र्यांनी सभा देखील घेतली होती. त्यामुळे या निवडणुकीत भाजपने हिंदुत्व सोडलं असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.
आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा वैयक्तिक करिष्मा घटला असून मागच्या काळात त्यांच्या नेतृत्वात असलेल्या राष्ट्रवादीचे 26 जिल्हा परिषद निवडणून आले होते मात्र सध्या त्यांच्या नेतृत्वात 19 सदस्य निवडून आले असल्याने हा करिश्मा घटल्याचे बोलले जात आहे. तर ओबीसी हा भाजपाचा डी एन ए असल्याचे भाजपकडून सांगितले जाते, माधव म्हणजेच माळी धनगर वंजारी या समूहाला संख्येच्या तुलनेत संधी दिली गेली नाही. त्यामुळे भाजपने केलेला राजकीय धोरणातील बदल चर्चेचा मुद्दा ठरला आहे.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महत्वाचा ठरलेला जरांगे फॅक्टर या निवडणुकीत ठळकपणे दिसून आला त्यांच्या आंदोलनाला यश आले 14 ओबीसींच्या उमेदवारांपैकी 5 जागा कुणबी आल्या आहेत त्यातील 3 जागा एकट्या धाराशिव तालुक्यातून असून त्यातील दोन भाजपाच्या आहेत तर एक जागा शिवसेना शिंदे गटाची आहे तर उर्वरित 2 जागा अपक्षांच्या आहेत. हा धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकांमधील सर्वात मोठा बदल समजला जातो.
भाजप धाराशिव जिल्ह्यात मोठा राजकीय पक्ष ठरला असला तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्या मुद्द्यांवर मतदान फिरले त्याच्या पेक्षा वेगळे मुद्दे आणि रणनीती भाजपने आखली त्यामुळेच हा विजय भाजपला मिळवता आला. धाराशिव नगरपालिका निवडणुकीत भाजपने मुस्लिम बहुल भागात स्वतःच उमेदवार दिला नव्हता तरीदेखील त्याभागात त्यांना चांगले मतदान मिळाले हे विशेष. हिंदुत्व सोडून भाजपला चांगले यश मिळत असून त्याचा काय परिणाम येणाऱ्या काळात होतो हे पाहावे लागेल.
तर भाजपाने थेट प्रचार न करता सुप्त पद्धतीने केला तर सोशल मीडियावर राज्य स्तरावरून प्रचार करण्यात आला. भाजपने धनशक्ती वापरल्याचा आरोप राजकीय विरोधकांकडून केला जात असला तरी प्रशासनाला तसे प्रकार न आढळल्याने आणि त्या संदर्भात कुठेही साधी तक्रार दिसून आली नाही.

निवडणून आलेल्या 19 सदस्यांपैकी केवळ 2 ते 3 सदस्य मूळ भाजपचे आहेत तर उर्वरित सदस्य हे आ. राणाजगजितसिंह पाटील समर्थक असून जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीत म्हणावे तसे प्रतिनिधित्व दिले नसल्याने मूळ भाजप विचारावर मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये देखील नाराजी पाहायला मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here