पळवलेले सदस्य दिले वापस, शिवसेनेचा आरोप भाजपने खरा ठरवला?

0
248


धाराशिव – जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणात एक महत्वाची घडामोड घडली असून काल भाजपकडून एक फोटो व्हायरल करण्यात आला त्यात पालकमंत्री प्रताप सरनाईक, उपनेते ज्ञानराज चौगुले, संपर्कप्रमुख राजन साळवी, भाजप आ. राणाजगजितसिंह पाटील त्यांचे पुत्र मल्हार पाटील, जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत, सुनील बनसोडे आणि पूजा शिंदे यांचा समावेश होता. मल्हार पाटील यांनी भाजप शिवसेना अभेद्य अशी पोस्ट करत फोटो पोस्ट केला होता तर राजन साळवी यांनी शिवसेना अभेद्य असे कॅप्शन देत फोटो पोस्ट केला होता. त्यावरून शिवसेना आणि भाजप मध्ये एकमत नाही हे दिसत आहे.

तो आरोप खरा ठरला?


जिल्हा परिषदेचा निकाल लागल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे दोन सदस्य भाजपने पळवले असल्याचा आरोप ॲड.अजित खोत यांनी पत्रकार परिषदेत केला होता तोच आरोप नंतर जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके आणि युवा सेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अविनाश खापे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. त्या पत्रकार परिषदेच्या अगोदर भाजपचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील नंदनवन येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याकरता गेले होते मात्र त्यांनी भेट नाकारली होती त्यांना तब्बल तीन तास तिथे थांबवावे लागले होते. दोन सदस्य भाजपच्या गोटात असल्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी ही भेट नाकारल्याचे त्यावेळी बोलले जात होते. त्याच सदस्यांना सोबत आणल्याशिवाय उपमुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली नाही. तसेच शिवसेनेच्या वतीने सदस्य पळवल्याच्या आरोपावर हे फोटो पाहून शिक्कामोर्तब होत असल्याचे जाणकार सांगतात.

आ. तानाजी सावंत यांची अनुपस्थिती


जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडीच्या संदर्भात सर्वाधिकार आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांना दिले असल्याचे बोलले जात आहे मात्र भाजपच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेताना आमदार तानाजी सावंत तिथे नव्हते त्यामुळे त्यांच्याशिवाय कुठलेच राजकीय समीकरण होणार नसल्याने ही भेट अधुरी आणि निष्फळ असल्याचे राजकीय जाणकार सांगतात

13 मार्च रोजी अध्यक्षपदाची निवड


13 मार्च रोजी धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी उपाध्यक्षांची निवड होणार असून भाजपकडे संख्याबळ जरी जास्त असले तरी ते बहुमतापासून लांब आहे. शिवसेना शिंदे गट हा जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणातला गेम चेंजर पक्ष असून शिंदे गट ठरवेल तोच अध्यक्ष होणार असून निवड होण्यापूर्वी नेमके राजकारण काय घडते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here