ईट (सोमेश्वर स्वामी ) धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलिसांनी गुन्हेगारी जगताला हादरवून टाकणारी एक ‘हाय-व्होल्टेज’ कारवाई केली आहे. वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पखरुड शिवारात सुरू असलेल्या अवैध अफूच्या शेतीवर पोलिसांनी ‘छापामार’ कारवाई करत, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडाकेबाज कारवाईने जिल्हाभरातील अंमली पदार्थ माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे!
पोलीस अधीक्षकांचा मास्टरप्लॅन; अन् शेत हादरलं!
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर यांनी चक्र फिरवली. पाखरुड शिवारातील अशोक, राजेंद्र आणि धोंडिबा चव्हाण या तीन शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोन्यासारख्या पिकांऐवजी ‘अफू’चे विष पेरल्याची खात्री पटताच, पोलिसांनी रात्रीच्या काळोखात सापळा रचला आणि एकाच वेळी झडप घातली!
दत्तक फौजफाटा आणि फॉरेन्सिक टीमचा ताफा!
ही कारवाई साधीसुधी नव्हती! पोलीस निरीक्षक शंकर शिंदे आणि त्यांच्या ‘किंग मेकर’ पथकाने संपूर्ण परिसराला वेढा घातला. पारदर्शकतेसाठी चक्क व्हिडिओग्राफर, कार्यकारी दंडाधिकारी आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले होते.
जप्तीचा ‘आकडा’ पाहून डोळे विस्फारतील!
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत ५८ किलोपेक्षा जास्त वजनाची ओला अफूची झाडे जप्त केली आहेत. यामध्ये:
अशोक चव्हाण: ३६ किलो अफू (किंमत ५.४० लाख)
राजेंद्र चव्हाण: १८ किलो अफू (किंमत २.७० लाख)
धोंडिबा चव्हाण: ४.५ किलो अफू (किंमत ६७ हजार)
एकूण ८ लाख ७७ हजारांचे ‘काळे सोने’ पोलिसांनी धुळीला मिळवले आहे!
आरोपींच्या मुसक्या आवळल्या, ‘NDPS’चा बडगा!
जागेवरच वजनाचा काटा फिरला आणि पंचनामा झाला! पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकून पोलीस कोठडीची हवा दाखवली आहे. त्यांच्यावर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांच्या या ‘धडाकेबाज’ कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, “गुन्हेगारांनो सावधान, आता तुमची खैर नाही!” असाच इशारा या कारवाईतून देण्यात आला आहे.
- पि.एम.श्री.जि.प.कें.प्रा.पारा शाळेतील पोषण आहारात अळ्या आढळल्याचा पालकांचा आरोप; अन्न व औषध पथकाकडून अन्नधान्याची तपासणी
- १३ वर्षांची प्रतीक्षा संपली; तासगाव बायपास रस्ता भूसंपादनाला अखेर गती
- मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने नूतन एमआयडीसीत ₹1100 कोटींची गुंतवणूक होणार – आम.रोहीत पाटील
- शेतीच्या वादातून चुलत्याचा खून; डोळ्यात मिरची पावडर टाकून तलवारीने वार
- आ. रोहित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन स्थगित
