अनेक युवकांचा शिवसेनेत प्रवेश; पक्षसंघटनेला बळकटी मिळण्याची अपेक्षा
धाराशिव : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार ओमराजे राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत धाराशिव शहरातील अनेक युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे शहरातील शिवसेना संघटनेला बळकटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
शिवसेनेत प्रवेश केलेल्या युवकांमध्ये गणेश घोणे, दर्शन घोणे, प्रतीक शिंदे, सुनील आदमाने, साहिल मुलाणी, संस्कार शिरसागर, साहिल पाटील, प्रशांत रखने, आदित्य लोखंडे, कृष्णा शिरसागर, ऋषिकेश लवटे, निखिल सारोळकर, वरुण बन्सोडे, किरण मगर, समर्थ लवटे, विवेक चिवरे, संकेत जवळे, ओमराज जगताप, शिवम इंगळे, ओम शाहणे, तन्मय कांबळे, श्रीकांत कुलकर्णी, अभय गराड, वैभव शाहणे, बिरांना घोडके, ओंकार पाटील, धीरज गरड आणि अभय अथर्व कुरेशी यांचा समावेश आहे.
या पक्षप्रवेशावेळी सोमनाथ गुरव, नितीन शेरखाने, रामेश्वर मगर, सह्याद्री राजेनिंबाळकर, अक्षय खळदकर, आदित्य हंबीरे, अमोल निकम, शंकर सूर्यवंशी, मालोजी सूर्यवंशी, गफूर शेख, प्रसाद राजेनिंबाळकर आणि हर्षद ठवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
धाराशिव शहरात शिवसेनेच्या संघटनात्मक विस्तारासाठी युवकांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नव्याने पक्षात दाखल झालेल्या युवकांचे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत करून त्यांच्या पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
- धाराशिव शहरातील युवकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश!
- ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून शेती विकास, जलसंवर्धनासह महिला सक्षमीकरणाला चालना,
- दुष्काळग्रस्त शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी माजी मंत्री आ. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
- चिंचपूरच्या शेतात गोवा बनावटीच्या मद्याचा साठा; ७.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- ज्ञानेश कुमारांना हटवा; केरळ विधानसभेचा ठराव!
