धाराशिव – शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये मागील १५ दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यासोबतच कचरा संकलनासाठी येणारी घंटागाडीही नियमित येत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
याबाबत नागरिकांनी मा. मुख्याधिकारी, यांना निवेदन दिले आहे. “आम्ही धाराशिव शहरात राहतो, राजस्थानच्या वाळवंटात नाही. नगरपालिकेला नियमित नळपट्टी भरत असताना पाणीपुरवठा का होत नाही?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
तसेच प्रभागात घंटागाडी येत नसल्याबद्दलही तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. “घंटागाडी येण्यासाठी अटारी बॉर्डर आडवी आहे का?” असा उपरोधिक प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी तात्काळ कचरा संकलन सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.
सदर सुविधा तातडीने सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
हे निवेदन प्रशांत बापू साळुंके, सुधीर बंडगर, महेंद्र शिंदे, अजित बाकले यांच्यासह प्रभागातील नागरिकांच्या वतीने देण्यात आले आहे.
- प्रभाग ४ मध्ये १५ दिवसांपासून पाणीटंचाई; घंटागाडीही गायब, आंदोलनाचा इशारा
- भाजपने हिंदुत्व सोडलं?, ‘माधव’ला धक्का?, जरांगे फॅक्टर चालला तर आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा करिष्मा घटला!
- पारदर्शक कारभाराचा वचननामा टांगला वेशीवर,भाजपने पत्रकारांना बाहेर काढून दाखवलं!
- धाराशिव जिल्ह्यात भाजप शिवसेनेपेक्षा केवळ 3 टक्क्यांनी पुढे
- परंडा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी चुरशीचे मतदान;७३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद!
