
धाराशिव : शहरातील हॉटेल मध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर होत असल्याचा प्रकार तहसील कार्यालयाच्या दक्षता पथकाने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी दोन व्यावसायिकांवर अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार १८ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी नायब तहसिलदार विशाखा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शहरातील विविध ठिकाणी अचानक तपासणी मोहीम राबवली. यावेळी डीआयसी रोडवरील पवार वडापाव मिसळ सेंटर तसेच काकडे प्लॉट येथील संजय राठोड यांच्या हॉटेल तेजप्रताप टी पॉईंट येथे तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान दोन्ही ठिकाणी व्यावसायिक वापरासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याचे आढळून आले. पवार वडापाव मिसळ सेंटर व हॉटेल तेजप्रताप येथून प्रत्येकी दोन असे एकूण चार सिलेंडर जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या सिलेंडरची एकूण किंमत सुमारे ३७१६ रुपये असल्याचे सांगण्यात आले.
याशिवाय, पॅराडाईज हॉटेलमध्ये तपासणी केली असता तेथे व्यावसायिक वापराचा अधिकृत सिलेंडर आढळून आला. त्यामुळे त्या ठिकाणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
जप्त केलेले सिलेंडर आनंद नगर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून, प्रभारी पुरवठा निरीक्षण अधिकारी विशाखा बलकवडे यांनी संबंधित व्यावसायिकांविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३ व ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशासनाकडून अशा प्रकारच्या गैरवापरावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला असून, व्यावसायिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
- संजय निंबाळकर व भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांचा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश; आ.कैलास पाटील यांच्या नेतृत्वात पक्षाची पुन्हा मजबूत बांधणी
- पारगावच्या लॉजवर AHTUचा धडाका!वेश्याव्यवसायावर पोलिसांची थेट कारवाई; परराज्यातील ८ महिलांची सुटका, लॉज मालक-मॅनेजर यांना अटक
- तुळजापुरात सरकारने हिंदुत्व गुंडाळलं, चायनिज कंपनीचे सीसीटीव्ही असलेल्या प्रकल्पाचे उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
- पवनचक्कीचे साहित्य चोरणारी सराईत टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
- परंड्यात अवैध शस्त्र बाळगणारे दोन अल्पवयीन पोलिसांच्या जाळ्यात; मॅगजिनसह अग्निशस्त्र जप्त