भाजपच्या बेगडी हिंदुत्वाचा बुरखा महंतांच्या पत्राने टरा टरा फाटला!

0
366

कुटील राजकारणापुढे महंतांची माघार?

धाराशिव – राजकारण हे सज्जनांचे क्षेत्र नाही असे म्हणतात ते खोटे ठरवण्याची जबाबदारी राजकीय पक्षांची असते. कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या नगरीत महंतांना कुटील राजकारणापुढे माघार घ्यावी लागली मात्र त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकामुळे भाजपच्या बेगडी हिंदुत्वाचा बुरखा फाटला आहे.धर्म, संस्कृती या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या भाजपने त्याच मुद्द्याचे पाईक असणाऱ्या महंतांना नगराध्यक्ष पदाचे तिकीट न दिल्याने हा बुरखा फाटला आहे. कालपर्यंत विरोधकांना शह काटशह देणाऱ्या भाजपाने थेट महंतांना उमेदवारी न देऊन आपल्याच विचारसरणीला मूठ माती दिली आहे.

महंत इच्छागिरी महाराजांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,मी महंत ईच्छागिरी, मठाधिपती सोमवार गिरी मठ, तुळजापूर श्री क्षेत्र तुळजापूरचे नाव गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत सातत्याने आहे, परंतु त्या चर्चेचे कारण शक्तीपीठ, धार्मिक, शैक्षिणक, क्रीडा, कला किंवा आध्यात्मित नसून व्यसन, अराजकता, गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि अस्वच्छ राजकारण हे होते. श्री क्षेत्र तुळजापूर ची ओळख शक्तीपीठ म्हणून आहे. तुळजापूर म्हणजे धर्म, परंपरा, मर्यादा व अध्यात्म ही आहे. पण गेल्या काही काळापासून तुळजापूरची ओळख एक दुर्दैवी आणि वाईट दिशेने वळवण्याचा प्रयत्न वारंवार होत आहे. जेव्हा समाजात अराजकता वाढते व राजसत्ता ही दिशाहीन होते, तेव्हा धर्मसतेने राजसते मध्ये हस्तक्षेप करून मार्गदर्शन करीत पुनर्स्थापना करणे आवश्यक असते.

याच भावनेतून मी, महंत योगी मावजीनाथ महाराज आणि महंत व्यंकट अरण्य महाराज यांनी या पवित्र भूमीच्या रक्षणासाठी तुळजापूर नगरपालिका निवडणूक 2025 मध्ये हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला.

तुळजापूर निवडणूक बद्दल महंतांचे स्पष्टीकरण

निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक नागरिक मला भेटण्यास येऊ लागले. एक मोठा लोकाग्रह सुरु झाला. त्यांचे एकंदरीत मत होते.

या पवित्र भूमीत पैशाचा जोरावर राजकारण होऊ नये. कारण जिथे अर्थकारणाच्या माध्यमातून सत्ता आणि सतेतून माध्यमातून अर्थकारण सुरू होते, तिथे विकासाचे सर्व मार्ग बंद होतात. यामुळे आम्ही शहरातील सर्व मान्यवर, ज्येष्ठ तसेच प्रतिष्ठित नागरिकांशी चर्चा केली यात विशेषतः सर्व पक्षीय नेते व पदाधिकारी ही सहभागी होते. त्याच वेळेस दोन्ही पक्ष बिनविरोध नगराध्यक्ष करण्याचे प्रस्ताव येऊ लागले.

तुळजापूर नगराध्यक्ष पद हे बिनविरोध व्हावे आणि शुद्ध मनाने प्रशासन चालावे या भावनेतून आम्ही सर्व पक्षांशी व सर्व उमेदवारांशी संवाद साधला. पण काही कारणांमुळे तो प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही.

इच्छागिरीउमेदवारी विषयी स्पष्टीकरण

मी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या नावे एक उमेदवारी अर्ज आणि एक अपक्ष अर्ज असे दोन अर्ज भरले होते. परंतु भाजपाची उमेदवारी न मिळाल्यामुळे पक्षाचा उमेदवारी अर्ज बाद झाला परंतु अपक्ष उमेदवारी अर्ज हा कायम राहिला. अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी गेले असता वेळेअभावी तो अर्ज मागे घेणे शक्य झाले नाही. मात्र हे मी स्पष्टपणे सांगतो मी या निवडणूक प्रक्रियेतील लढतीचा भाग नाही.

तरी तुळजापूरकरांना माझे जाहीर निवेदन आहे की कृपया इतर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारापैकी योग्य व्यक्तीस आपण निवडावे व एक लक्षात ठेवावे आपण फक्त एक बटण दाबत नाही तर आपले पाच वर्षाचे भविष्य ठरवत आहोत. 100% मतदान करावे.

सदरील सर्व प्रक्रियेमध्ये आपण तुळजापूर नगरीतील सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व पक्षाच्या सदस्यांचे सहकार्य लाभले.

महंत इच्छागिरी महाराज सध्या संत मार्गदर्शक समिती, विश्व हिंदू परिषद, विभाग- धाराशिव.
सदस्य श्री. पंच दशनाम जुना आखाडा, वाराणसी, उत्तर प्रदेश,मठाधिपती – सोमवारगिरी मठ, तुळजापूर,
अध्यक्ष – नारायणगिरी मठ ट्रस्ट, तुळजापूर,सचिव – श्री दुधेश्वर नाथ महादेव मंदिर, गाझियाबाद, उत्तर प्रदेश
संरक्षक नमम फाउंडेशन, उत्तर प्रदेश,
अध्यक्ष, मठ मंदिर समन्वय समिती, विभाग – तुळजापूर
संरक्षक – अंतर राष्ट्रीय हिंदू शक्ती सेना, भारत वर्ष अशा विविध जबाबदा-या पार पाडत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here