धाराशिव दि.२३ (प्रतिनिधी) – तालुक्यातील जागजी येथील एन.व्ही.पी. शुगर प्रा. लि., या कारखान्याच्या चाचणी गळीत हंगामाचा शुभारंभ दि.२४ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे.गळीत हंगामाच्या शुभारंभ खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व जागजी येथील ज्येष्ठ नागरिक रंगनाथराव सावंत गुरुजी, हभप नवनाथ महाराज चिखलीकर, ऊस उत्पादक शेतकरी हनुमंतराव देशमुख, हभप काकासाहेब डांगे, तानाजी मगर, भारत लोमटे, सुभाष पाटील, अभिजीत मगर, सुधाकर साळुंखे, आत्माराम सरडे, अनुरथ भोसले, तुळशीदास जमाले, काकासाहेब मिसाळ, जहॉंगीर सय्यद, बाबासाहेब शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशव उर्फ बाबा पाटील, कुलदीप पाटील (विटेकर), स्वराज ट्रॅक्टरचे डीलर हिम्मतराव पाटील, सचिन शिंदे व साई श्रुती इंडस्ट्रीजचे सोमनाथ जानते हे उपस्थित राहणार आहेत. धाराशिव तालुक्यातील जागजी येथे अल्पावधीतच नव्याने उभा राहिलेल्या एन. व्ही. पी. शुगरच्या चाचणी गळीत हंगामाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमास परिसरातील ऊस उत्पादक शेतकर्यासाठी पाटील बंधूनी अवघ्या १० महिन्यामध्ये कारखाना उभारला आहे. रविवारी कारखान्याच्या गळीत हंगामास प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे.या कार्यक्रमास जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आप्पासाहेब व्यंकटराव पाटील, धनंजय व्यंकटराव पाटील व नानासाहेब व्यंकटराव पाटील यांनी केले आहे.