उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सई भोरे पाटील यांचा करण्यात आला सत्कार
सलगरा – प्रतिक भोसले
तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथे आयोजित श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास ८ मे पासून प्रारंभ झाला होता. या मध्ये येथील महादेव मंदिरात उपस्थित भजनी मंडळ, तसेच गावातील ग्रामस्थ व विविध पदांचे पदाधिकारी यांच्या समवेत महापूजा, ज्ञानेश्वरी पारायण, राम कथा, भजन, प्रवचन, नामजप, हरिपाठ, कीर्तन, या सह विविध मान्यवरांची प्रवचने, किर्तने असे विविध कार्यक्रम झाले. या भक्तिमय सोहळ्याची सांगता दि.१५ मे रोजी काल्याच्या किर्तनाने झाली. या वेळी टाळ मृदंगाच्या गजराने श्री शंभु महादेव परिसर दुमदुमून गेला. राम कथा प्रवक्ते म्हणून श्री ह.भ.प.गुरुवर्य महेश महाराज यांनी सेवा पार पाडली तसेच शेवटी काल्याच्या किर्तनाची सेवा पण महेश महाराज यांनीच दिली आणि श्री ह.भ.प. गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज यांच्या हस्ते काला वाटप झाला.
तर सप्ताहनिमित्त ८ ते १५ मे या कालावधीत श्री जय हनुमान भजनी मंडळ आणि संत भगवान महाराज शिवणीकर मृदंग गुरूकुल बाल वारकरी मंडळ लातुर आणि बाल भजनी मंडळ गंधोरा, सलगरा ग्रामपंचायत कार्यालय, यात्रा कमिटी आणि ग्रामस्थ आदींच्या सहकार्याने विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या सप्ताह सोहळ्यात वैभव महाराज शेरेकर, किशोर महाराज अरजखेडा, बाळु महाराज गिरगावकर, बाबा महाराज काटगावकर, ज्ञानेश्वर महाराज बुलढाणेकर, भुषण महाराज तळणीकर, गुरुवर्य विठ्ठल महाराज वासकर आदींची किर्तन सेवा झाली. हा सप्ताह यशस्वीरित्या पुर्ण करण्यासाठी अनिल मुळे, शिलू लोमटे, संतोष जाधव, आबा केदार, तात्या लोमटे, कुमार लोमटे, विजयकुमार लोमटे, रमेश रवळे, ज्ञानेश्र्वर नगमोडे, ज्ञानेश्र्वर बोधणे, विनायक गुंजकर, विश्वनाथ मुळे, अशोक भरगंडे, दयानंद पांचाळ, राजेंद्र कोळी आदींनी परिश्रम घेतले.
त्या नंतर दि.१५ आणि १६ मे रोजी श्री चा विवाह सोहळा आणि श्री ची भव्य मिरवणुक (छबिना) आणि शोभेची दारू उडवण्यात आली. विवाह सोहळ्यासाठी माधव दशरथ लोमटे आणि संभाजी मुरलीधर मुळे हे प्रमुख मानकरी होते. लग्नसोहळा आणि छबिना पाहण्यासाठी किलज, गंधोरा, वाणेगाव, वडगाव सह पंचक्रोशीतील भाविक मोठय़ा संख्येने दर्शनासाठी येत असतात त्या मुळे यात्रेत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून दि.१६ मे रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील यांच्या आदेशावरून नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सपोनि सुधीर मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील यांनी ग्रामदैवत श्री शंभु महादेवाचे दर्शन घेऊन यात्रा कमिटीशी संवाद साधला या वेळी त्यांचा सरपंच विष्णु वाघमारे, उपसरपंच प्रशांत लोमटे, अंजली पाटील, प्रतिभा मोरे यांच्या सह उपस्थित मान्यवर आणि यात्रा कमिटी यांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच सपोनि सुधीर मोटे यांनी योग्य प्रकारे पोलीस बंदोबस्त लावल्याबद्दल त्यांचे सुद्धा यात्रा कमिटीने आभार मानले. अशा प्रकारे यंदाची हि यात्रा यशस्वी करण्यासाठी सलगरा ग्रामपंचायत कार्यालय, यात्रा कमिटी आणि ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले. यात्रेमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस कर्मचारी धनंजय वाघमारे, लक्ष्मण शिंदे, जितेंद्र कोळी, शिवाजी राठोड, अजय जमादार, बालाजी कांबळे, विशाल सगर यांच्या सह ईतर कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवत यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.