उस्मानाबाद – गेले काही दिवस रिक्त असलेल्या आणि प्रभारी अधिकाऱ्यावर भार असलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक पदी आता अतुल कुलकर्णी यांची नियुक्ती झाली आहे. त्यांची विद्यमान पदस्थापना अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर ही होती. ते २०१५ च्या बॅच चे अधिकारी आहेत. २०१६ साली सोलापूर ग्रामीण येथे त्यांचा परिक्षाविधिन कालावधी पार पडला तर २०१७ ते २०१९ दरम्यान त्यांनी ठाणे येथे सहायक पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले. तसेच नक्षल विरोधी कारवायांमध्ये देखील त्यांनी सहभाग घेतला आहे.
उस्मानाबाद जिल्हा पोलिस अधीक्षक पदी अतुल कुलकर्णी
RELATED ARTICLES