सलगरा,दि.९(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी ऑनलाईन जाहीर झाला. त्या नुसार जिल्ह्याचा निकाल ९७.६९ इतका लागला असून गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी पण मुलींनीच बाजी मारली आहे. तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.३६ टक्के इतके आहे. आणि मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.९९ टक्के इतके आहे. बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील १६ हजार ३३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, या मध्ये ८ हजार ९८० मुले तर ७३५० मुलींचा समावेश होता. मात्र प्रत्यक्ष १६ हजार ३४ विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिली. या मध्ये जवळपास २९६ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली होती.
त्या मध्ये तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथील कै. अंबुमाता महाविद्यालयाचा निकाल बघितला असता या मध्ये पण मुलींनीच बाजी मारली आहे. अंबुमाता महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील १५२ पैकी १४८ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले असून विज्ञान शाखेचा ९७.३६ टक्के इतका निकाल लागला आहे. तर कला शाखेतील ८० पैकी ७२ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत कला शाखेचा ९०.०० टक्के इतका निकाल लागला असून अंबुमाता महाविद्यालयाचा एकूण ९४.८२ टक्के इतका निकाल लागला आहे. १२ वी विज्ञान शाखेतून वाघमारे क्रांती सदाशिव (प्रथम) ८५.१७%, सुपेकर ऐश्वर्या खंडू (द्वितीय) ८४.०० %, भांगे कांचन उदय (द्वितीय)८४.००%
वाले अंजली देवानंद (तृतीय) ८३.००% आणि कला शाखेतून ननवरे बालिका (प्रथम) ७३.६७%, पठाण बिलकिज (द्वितीय) ७१.६६%, आणि गायकवाड प्रतिक्षा (तृतीय) ७०.३४%, या सर्व गुणवंतांचे प्राचार्य ज्ञानेश्वर लोमटे, प्रा.प्रताप मोरे, प्रा. किरण लोमटे, प्रा.अनिल लोमटे, प्रा.बालाजी फुलमाळी, प्रा.फयाज पटेल, प्रा. महादेव लोमटे, प्रा. चव्हाण सिताराम, प्रा.सोमवंशी सुरेश, लिपिक राहुल काटवटे, प्रयोग शाळा सहायक पटेल आर.पी आदींनी कौतुक केले.