२२ लाखांची बेहिशोबी मालमत्ता ; कळंबच्या तत्कालीन तहसीलदार वैशाली पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

0
77

 



उस्मानाबाद – वैशाली नेमगोंडा पाटील, तत्कालीन तहसिलदार, तहसिल कार्यालय कळंब, जि. उस्मानाबाद यांनी २२,०४,३३७/- रुपये (२९%) बेहिशोबी मालमत्ता (अपसंपदा) संपादित केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वैशाली पाटील ह्या तहसिलदार या पदावर तहसिल कार्यालय कळंब येथे कार्यरत असताना त्यांचे विरुध्दचे प्राप्त तक्रारीतील उघड चौकशी क्रमांक ४१/ उबाद / २०१६ मधील माहे ०३ /२००८ ते दि.३०.०६.२०१६ या परिक्षण कालावधीत त्यांनी त्यांना सर्व ज्ञात व कायदेशीर मार्गाने मिळालेल्या उत्पन्नापेक्षा २२,०४,३३७/- रुपये (२९%) बेहिशोबी मालमत्ता ( अपसंपदा) संपादित करुन गुन्हेगारी स्वरुपाचे गैरवर्तन केल्याचे सदर उघड चौकशीमध्ये निष्पन्न झाल्याने त्यांचेविरुध्द प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्याने पोलीस ठाणे कळंब येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास श्री. अशोक हुलगे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here