परंडा कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील व्यापारांना गाळे खाली करण्याची नोटीस,गाळेधारकांमध्ये खळबळ

0
87

 परंडा कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील व्यापारांना गाळे खाली करण्याची नोटीस,गाळेधारकांमध्ये खळबळ


माजी आ.ज्ञानेश्वर पाटील व माजी आ. राहुल मोटे गाळे धारकांना जाणीव पुर्वक त्रास देत असल्याचा गाळेधारकांचा आरोप


बाजार समीती समोरील गाळे प्रकरणाला राजकीय वळण


परंडा ( दि ७ ऑक्टोबार) परंडा  कृषी उत्पन्न बाजार समीती समोरील गाळे आमच्या खासगी मालकीच्या जागेत असुन माजी आ. ज्ञानेश्वर पाटील व माजी आ.राहुल मोटे गाळे धारकांना जानीव पुर्वक त्रास देत असल्याचा आरोप गाळे धारक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.

       दि ७ ऑक्टोबर रोजी शासकीय विश्राम गृह येथे गाळेधारकांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी गाळे धारक फैजूद्दीन चौधरी, मनोज कोळगे,स्वरूपसिंह ठाकुर, शहबाज पठाण,महेदिमिया जिनेरी,इलियास डोंगरे,साजीद सौदागर,एराफ सौदागर उपस्थित होते.

       कृषी उत्पन्न बाजार समीच्या  समोरील जागेतील २३ व्यापाऱ्यांना ७ दिवसात अतिक्रमण काढण्याच्या नोटीसा  दि २७ सप्टेंबर रोजी कृषी उत्पन्ना बाजार समितीच्या वतीने सचिव पाटील यांनी बजावल्या आहेत.या नोटीशी मुळे गाळे धारकामध्ये खळबळ उडाली असुन बाजार समीती समोरील सोनारी रोड लगत ची जागा आम्ही दिक्षीत यांच्या कडून खरेदी केलेली असुन गाळे बांधकामाच्या रितसर सर्व परवानगी घेऊन गाळे बांधकाम केलेले असल्याचे म्हटले आहे.

            कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या पूर्व बाजुला जागा सोडण्यात आली असल्याने मोजणी चुकीची झाल्याने फेर मोजणी करण्यात आली आहे. मात्र मोजणीचा नकाशा राजकीय दबावापोटी मोजणी कार्यालयातुन देण्यात येत नसल्याचा आरोप गाळेधारकांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.

        प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबीत असताना बाजार समिती कडून नोटीसा काढणे अन्यायकारक असुन केवळ राजकीय द्वेषा पोटी त्रास देण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here