परंडा (भजनदास गुडे )ग्लोबल मधील प्रत्येक विदयार्थी हा तंत्रज्ञान तसेच डिजीटल जगातही मागे राहिला नाही पाहिजे तसेच मुलांसमोर आलेले प्रत्येक आव्हान मुलांनी यशस्वीपणे स्विकारले पाहिजे हा उद्देश समोर ठेवून दि१५ जुलै रोजी माता पालक मेळाव्यासाठी उपस्थित महिलांच्या हस्ते डिजीटल क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी जिजाऊ ब्रिगेड,उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष तथा श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव शिवमती आशाताई गोरख मोरजकर,मराठा सेवा संघाचे जेष्ठ मार्गदर्शक शिवश्री रविदादा मोरे, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष शिवश्री गोरख मोरजकर, जिजाऊ ब्रिगेडच्या माजी तालुका अध्यक्ष अर्चनाताई भांडवलकर, शिवश्री धर्मराज गटकुळ यांच्यासह मोठ्या संख्येने पालक, मुख्याध्यापक,शिक्षक उपस्थित होते.
कोरोनामुळे दोन वर्षानंतर हि पहिलीच माता पालक बैठक झाली. कोरोना काळात दोन वर्ष शाळा बंद असल्यामुळे मुलांची झालेली अधोगती कशी भरून काढता येईल,मुलांना अभ्यासासोबत संस्कार कसे देता येतील,मुलांनी नेहमी सकारात्मक विचार करावा यासाठी काय करता येईल,लहान मुलांची मानसिकता पाहून त्यांचे संगोपन कसे करायचे अशा अनेक गोष्टीवर शिवमती आशाताई मोरजकर मॅडम यांनी माता पालकांना मार्गदर्शन केले.
माता पालक मेळावा आयोजित करण्याचा उद्देश म्हणजे मुलांना वडिलांपेक्षा आईचा जास्त सहवास असतो. जर आईलाच आपल्या मुलांविषयी प्रगतीचा अहवाल दिला व मुलांचा अभ्यास कसा घ्यायला हवा त्यांना आज काळानुसार मुलांना संस्काराची आवश्यकता किती आहे या विषयी माहिती सांगितली तर मुलांची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही.असेही सौ. मोरजकर यांनी उपस्थीत माता पालकांना सांगीतले. कार्यक्रमास उपस्थीत बहुतांशी महिला पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.