जुगार खेळणाऱ्या १९ जणांवर पोलीसांची कारवाई, १० लाखाचा मुद्देमाल जप्त

0
77

उस्मानाबाद जुगार खेळणाऱ्या १९ जणांवर स्थानिक गुन्हे शाखेने  कारवाई केली असून १० लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत माहिती अशी की दि.२१ जुलै रोजी उमरगा उपविभागात पोलीस गस्तीस होते. दरम्यान सपोनि शैलेश पवार यांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली कि, मनोहरनगर, होळी तांडा ग्रामस्थ- दत्ता चव्हाण यांचे शेतात एका पत्राचे शेडमध्ये काही इसम तिर्रट नावाचा जुगार खेळत आहेत. यावर पथकाने त्या ठिकाणी १७.०० वा. सु. छापा टाकला असता तेथे दत्ता चव्हाण,राजेंद्र चव्हाण,बबन चव्हाण,विकास राठोड,संतोष राठोड,अजित जाधव,गुलाब चव्हाण,बाबु चव्हाण,विजय चव्हाण, सर्व रा. होळी तांडा, ता. लोहारा, खंडु खराटे ,अरुण गायकवाड,विश्वनाथ क्षिरसागर,महावीर सुरवसे,रफीक शेख,सचिन मुनाळे,शकील शिरगापुरे,बाबुराव दुधभाते, सर्व रा. किल्लारी, ता. औसा, जि. लातूर रोहन पवार, रा. माकणी अजय चव्हाण, रा. राजेगाव, ता. लोहारा हे सर्व लोक तिर्रट जुगार खेळताना मिळुन आले. त्यांचेकडे जुगाराबाबत विचारणा केली असता सदर पत्रा शेडचे मालक दत्ता चव्हाण हेच जुगाराचा अड्डा चालवित असल्याचे समजले. त्या ठिकाणाहून जुगाराचे साहित्यासह 05 मोटारसायकल, 01 कार, 17 भ्रमणध्वनी व 29,300 रु. रोख रक्कम असा एकुण 10,31,880 रु चा मुददेमाल पोलीसांनी जप्त केला असुन त्यांचेविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 4,5 प्रमाणे लेाहारा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

            सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोनि-रामेश्वर खनाळ, सपोनि- शैलेश पवार, पोहेकॉ- प्रकाश औताडे, जावेद काझी, हुसेन सय्य्द, मेहबुब अरब, धनंजय कवडे, पोना- शौकत पठाण, अमोल चव्हाण, अशोक ढगारे या पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here