मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ भूम तालुक्यामधून हजारो मराठा बांधवांची मुंबईकडे कूच

0
73

मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.

भूम प्रतिनिधी :- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी भूम तालुक्यातून मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने सकल मराठा बांधव वाहनांसह मुंबईकडे रवाना होत आहेत. समाज बांधव तालुक्यातील गाव, वाडी, वस्ती वरुन साधारण ११३५ चारचाकी वाहनाने. नागरिक जरांगेना साथ देण्यासाठी एक मराठा लाख मराठा,आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापच, कोण म्हणतंय देत नाय घेतल्याशिवाय रहात नाय, आता कुठे जायचं मुंबईला जायचं, अशी जोरदार घोषणाबाजी करत आले. यावेळी सकल मराठा बांधवांना मार्गदर्शन करताना अनिल शेंडगे म्हणाले की आंदोलनातील सर्व चारचाकी वाहने वाहतुकीला अडथळा होणार नाहीत ,अशी ओळीत चालवाव्यात. तसेच तानाजी पाटील म्हणाले की आत्तापर्यंत सुसंस्कृतपणा दाखवत शांततेत ज्या पद्धतीने मोर्चे झाले त्याच पद्धतीने शांततेचे व शिस्तीचे प्रदर्शन करत मुंबईला पोहोचावे व आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेत मुंबई पोहोचावे. तर ऍड. रामराजे साळुंके म्हणाले की कोर्टाने कुठलाही आदेश काढून मुंबईला येण्यास मज्जाव केलेलानाही त्यामुळे कुठल्याही संकोच न बाळगता सकल मराठा बांधवांनी मुंबईस निघावे. तसेच आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की यावेळी सहभागी आंदोलनाला येणाऱ्या सर्व समाज बांधवांची सर्व सोय ठीक ठिकाणी असेलच पन येणाऱ्यांनी देखील आपआपली तयारी ठेवावी जेणे करून कुठलीही गैर सोय होणार नाही. मनोज जरांगे यांच्या सूचने नुसारच आंदोलनाची रूपरेषा असेल असे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here