back to top
Monday, September 16, 2024
Google search engine
Homeसोलापूरकोरोना काळात घरी बसणारे आज दररोज सभा, आक्रोश मेळावे घेताहेत

कोरोना काळात घरी बसणारे आज दररोज सभा, आक्रोश मेळावे घेताहेत

 उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांची विरोधकांवर टीका

सांगोला (तालुका प्रतिनिधी): पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीनंतर राज्यात सत्तातंराला सुरुवात झाली. अडीच वर्षे सत्तेत नसल्याने आघाडी सरकारने भाजपच्या कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने गुन्हे दाखल केले. प्रशासकीय बदल्या, गुन्हे दाखल होत असल्याने कार्यकर्ते दबावात होते. पालकमंत्री कामे करण्यासाठी सक्षम आहेत. कामे कशी करावीत हे कार्यकर्त्यांनी काँग्रेसकडून शिकावे. दररोज अजित पवार, जयंत पाटील घोषणा करत आहेत. कोरोना काळात घरी बसणारे आज दररोज सभा, आक्रोश मेळावे घेत आहेत अशी विरोधकांवर जोरदार टीका राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकात पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. ते सांगोल्यात भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

       राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकात पाटील हे सांगोल्यात भाजपचे पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, कार्यकर्त्यांच्या कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर, जिल्हाध्यक्ष आ.सचिन कल्याणशेट्टी, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, धैर्यशील मोहिते-पाटील, शशिकांत चव्हाण, भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार,  माजी सभापती संभाजी आलदर, शिवाजीराव गायकवाड, बंडू केदार, राजश्री नागणे, माजी पंचायत समिती सदस्य सीताराम सरगर, गजानन भाकरे, जगदीश बाबर, एन. वाय. भोसले, शीतल लादे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

       यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकात पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आगामी काळात सांगोला तालुक्यात भाजपचे संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा असे आवाहन केले. दरम्यान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी बैठकीत लोकसभा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न, अडीअडचणी जाणून घेत बैठकीतूनच अधिकाऱ्यांशी दूरध्वनीकरून संपर्क साधत गावांच्या समस्या तात्काळ सोडविण्याच्या सूचना दिल्या. तसेच लवकरच सांगोला तालुक्याची आढावा बैठक घेवून प्रत्येक गावांचा गावभेट दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.




—–———————————–

तालुक्यात भाजपची यंत्रणा सक्षमपणे काम करत आहे. शेतकऱ्यांसाठी देशातील पहिली किसान रेल्वे सांगोल्यातून सुरू झाली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सांगोला विधानसभा मतदारसंघात भाजप- शिवसेना युतीचा उमेदवार नक्कीच विजयी होणार असल्याचा ठाम विश्वास भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी व्यक्त केला.

—————————————-

कोरोनामुळे अडीच वर्षे खासदार फंड मिळाला नाही.  येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपर्यंत तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार. मोदी सरकारने कोरोना प्रतिबंधक लस मोफत दिली. आता गावोगावी जनतेच्या अडीअडचणी जाऊन अडचणी जाणून घेणार आहे. चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकवू असा इशारा खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी दिला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments