रिधोरे/प्रतिनिधी:– (अतुल गवळी)
“प्रबोधनातून समृद्धीकडे”हे ब्रीदवाक्य घेऊन इंडियन डेअरी फार्मर असोसिएशन अर्थात IDFA ही संस्था काम करत असून जिल्ह्यातील दुग्धव्यावसायिकांसाठी इंडियन डेयरी फार्मर्स असोसिएशनने IDFAच्या त्रैमासिक एक दिवसीय मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन दि.२७ रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत श्रीराम डायनिंग हॉल,कुर्डूवाडी.ता.माढा येथे करण्यात आले आहे
या मार्गदर्शन शिबिरात डॉ.सचिन रहाणे.M.V.Sc.(पशुधन विकास अधिकारी) हे फायदेशीर दुग्ध व्यवसायासाठी – कालवड संगोपन या विषयावर तर श्री.उग्रसेन जाखड,गोदरेज मॅक्सीमिल्क(नाशिक) हे एम्ब्रिओ ट्रान्स्फर टेक्नोलॉजी (IVF)या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत.
शेतकऱ्यांच्या दुग्ध व्यवसायाच्या दृष्टीने हा अत्यंत उपयुक्त व फायदेशीर मार्गदर्शन सेमिनार असून जास्तीत जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन
श्री.विशाल गणगे,श्री.महावीर सावळे,श्री.गायकवाड सर,
श्री.राजकुमार दळवे,डॉ.राजू पांढरे यांनी केले आहे.
डॉ.सचिन रहाणे लिखित “फायदेशीर दुग्ध व्यवसायासाठी कालवड संगोपन” या बहुप्रतिक्षित पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
गोठ्यात येणाऱ्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी प्रश्नमंजुषाद्वारे ज्ञान व मदत घेऊन त्यावर कित्येकदा योग्य व अचूक सल्ला,मार्गदर्शन मिळत नाही त्यामुळे अनेकदा दुग्धव्यवसाय उभा राहतो व दोन वर्षाच्या आत मोडकळीस येतो परिणामी दुध उत्पादक शेतक-याचे प्रचंड नुकसान होते.म्हणूनच या समस्या सोडविण्यासाठी व दुग्धव्यवसाय नफ्यात आणण्यासाठी IDFA मोफत मार्गदर्शन शिबीराचे आयोजित करतात.
या मिटिंगसाठीमध्ये दुध व्यवसायातील समस्यां,अडचणी, गोठ्यातील योग्य व दुधाळ जनावरांच्या निवडी,उच्च प्रतिच्या कालवडी पैदास करणे, कालवडींचे व्यवस्थापन करणे यांवर तज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिराला दुग्धव्यवसाय करणाऱ्या व भविष्यात करू इच्छिणांऱ्या तसेच दुग्धव्यवसाय नफ्यात आणण्यासाठी दुग्धव्यवसायिक शेतकरी बांधव,महिलांनी हजर राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.