परंडा (प्रतिनिधी) परंडा येथे दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या मार्गदर्शना खाली पंचायत समीती सभाग्रहात परंडा येथे दि१०डिसेम्बंर रोजी दिव्यांग सन्मान सोहळा संपन्न झाला.
या वेळी विविध क्षेत्रातील दिव्यांगांचा व पत्रकारांचा दिव्यांग उद्योग समुहाच्या वतीने शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ,ट्रॅफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला परंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे,माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल,मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष गोरख मोरजकर,पै.नानासाहेब पवार,मा. सरपंच रावसाहेब खरसडे,दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष पांडुरंग मिसाळ,सचिव पांडुरंग चोबे, शहराध्यक्ष गोरख देशमाने उपस्थित होते.
यावेळी दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने दिव्यांग पत्रकार प्रकाश काशीद,भजनदास गुडे, प्रशांत मिश्रा,मुजीब काझी,गोरख देशमाने,उदय साबळे यांना दिव्यांग स्वावलंबन सन्मान ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले
तसेच दिव्यांग आसूनही विवीध क्षत्रात उत्कृष्ट यश संपादन करणारे विद्यार्थी,उत्कृष्ट काम करणारे शेतकरी,महिला यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी दिव्यांग कोट्यातून शासकीय मेडीकल कॉलेज एमबीबीएस प्रवेशासाठी पात्र ठरलेला विद्यार्थी सुमित सतीश शिंदे,शासकीय इंजिनिअरीग आयटी साठी पात्र ठरलेला विद्यार्थी सुरज भजनदास गुडे यांच्यासह सीमा शिवाजी जाधव,संतोष कुलकर्णी,भारत झोंबाडे,सुरेखा उबरदंड,पांडुरंग मिसाळ या दिव्यांगांना दिव्यांग स्वावलंबन सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये परंडा तहसीलच्या पुरवठा विभागाचे पेशाकार भांडवलकर व आशिष ठाकुर यांच्या हस्ते पात्र ५० दिव्यांगांना अंत्योदयच्या शिधा पत्रीकेचे वाटप करण्यात आले.
तसेच ३० दिव्यांगांना दिव्यांग मानधन मंजुरी पत्राचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके यांनी पुढाकार घेतला होता.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवशाहीर शरद नवले सर यांनी केले.या कार्यक्रमावेळी अशोक भराडे,उत्तम मिसाळ,विठ्ठल शिरसागर,निवृत्ती वारे,गणेश बैरागी,सचिन जाधव,शुभम बैरागी,समाधान पन्हाळे,आविदा टाळके,तानाजी सांगडे,हंबीरराव मुळे आदी दिव्यांग उपस्थित होते.