मुंबई – आज दि १४ फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये विविध निर्णय घेण्यात आले ते संक्षिप्त स्वरूपात खालीलप्रमाणे
* राज्यात पीएम श्री योजना राबवून शाळांचे सक्षमीकरण करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात ८१६ शाळा विकसित केल्या जातील.
* धान शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल. १ हजार कोटी निधीस मान्यता दिली असून त्याचा ५ लाख शेतकऱ्यांना लाभ होईल.
*महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण अधिनियमास मान्यता देण्यात आली. औषधी, वैद्यकीय उपकरणांची खरेदी आता मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत होईल.
*पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेसच्या कामांना गती दिली जाईल. सुमारे ७८७ कोटी खर्चास मान्यता देण्यात आली. ७६९० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
* पुणे जिल्ह्यातील तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळासाठी ३९७ कोटी ५४ लाख, जेजुरी तीर्थक्षेत्रासाठी १२७ कोटी २७ लाख तसेच सेवाग्राम विकासासाठी १६२ कोटींच्या विकास आराखड्यांचे सादरीकरण.
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र आणि महाराष्ट्र सीओईपी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीमध्ये सुधारणा करण्यात येईल. यासंदर्भात अध्यादेश काढला जाणार आहे.
*राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे राज्य मंत्रिमंडळाने अभिनंदन केले. राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यात शासनाला मार्गदर्शन केल्याबद्दल अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला.