मुंबई – आतापर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक होते, येणाऱ्या काळात अव्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठीही जात प्रमाणपत्र पडताळणी अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी विधानपरिषदेत दिली. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू असून त्या अधिवेशनात ही घोषणा करण्यात आली आहे.
हे आहेत अव्यवसायिक अभ्यासक्रम
कला आणि ललित कला, मानसनिती व समाजशास्त्र विद्याशाखेत – बी ए आणि एम ए
वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेत बी. कॉम., एम. कॉम.
विज्ञान विद्याशाखेत बी.एस्सी., एम.एस्सी.
हे आहेत व्यावसायिक अभ्यासक्रम
कला आणि ललित कला विद्याशाखेत
बी. एफ. ए., एम. एफ. ए.
मानसनिती व समाजशास्त्र विद्याशाखेत
बी. एस. डब्ल्यु., एम. एस. डब्ल्यु., बी.लिब. एम.लिब., डि.पी.ए., बी.सी.जे., एम.सी.जे.
वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेत
बी.बी.ए., बी. बी. एस., बी.बी.एम. ( ई-कॉम) बी.सी.ए., एम.बी.ए., एम. पी. एम., एम. सी. एम., एम. एम. एस., डी. बी. एम., डी.सी.एम., डी.सी.ए., ओ.डी.एस.टी. एम., डी. एम. अॅन्ड ई. एम. आय., एम. बी. एम. (मॅनेजमेंट स्टडीज / पर्सोनल मॅनेजमेंट / ), एम. बी. एम. (मॅनेजमेंट स्टडीज) बी. ई कॉमर्स, पी. जी. डिप्लोमा (डिझायस्टर मॅनेजमेंट)
विज्ञान विद्याशाखेत
एम. सी. ए.
शिक्षण शास्त्र विद्याशाखेत
बी.एड., बी.पी.एड.,
बी.पी.ई., एम. एड., एम.पी.एड.
अभियांत्रिकी विद्याशाखेत
बी. ई., बी. टेक., बी. कैम., बी. आर्की, एम. ई. एम. आर्की., एम. टेक.
विधी विद्याशाखेत
एलएल.बी., बी.एस.एल., बी.ए.एल.एल.बी. एलएल. एम. डी. टी. एल., डी. एलएल. अॅन्ड एल. डब्ल्यु.
औषधनिर्माण विद्याशाखेत
बी. फार्मसी., एम. फार्मसी, बी. टेक. (कॉस्मेटीक)
शरद पवार ग्रामसमृध्दी योजनेत हा झाला बदल
रुग्णालयातील मेडिकल मधून औषधे घेण्याची सक्ती करता येत नाही